परिवर्तन मंडळाचा 12 जागांवर दणदणीत विजय
राहुरी तालुक्यातील मांजरी येथील अतिशय चुरशीने पार पडलेल्या सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये श्री चंद्रगिरी परिवर्तन मंडळाने बारा जागा जिंकल्या सत्ता मिळविण्यात यश प्राप्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, मांजरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत चद्रंगिरी परिवर्तन मंडळ व चद्रंगिरी जनसेवा हे गट आमनेसामने निवडणुकीत आपले नशीब आजमावत होते.सदर निवडणुकी मध्ये चद्रंगिरी परिवर्तन मंडळाने बारा जागांवर विजय मिळवत आपला राजकीय गड राखला आहे
या निवडणुकीत चद्रंगिरी परिवर्तन मंडळाच्या विजयासाठी लक्ष्मण चोपडे, भानुदास बाचकर, दशरथ विटनोर, रावसाहेब लिबांहरी विटनोर,भाऊसाहेब विटनोर,अशोक बिडगर,आदींनी परिश्रम घेतले.
सदर निवडणुकीमध्ये चंद्रगिरी परिवर्तन मंडळाचे विटनोर तुषार बाबासाहेब,भगत पोपट लक्ष्मण,विटनोर भाऊसाहेब गगांधर,विटनोर गोरख भाऊसाहेब,बिडगर अषिश विठ्ठल,काळे शिवाजी लहानु,चोपडे भानुदास भिमाजी,विटनोर सपंत रामा,बाचकर पाटीलबा कोंडाजी,विटनोर मिराबाई पुजां,विटनोर सावित्रीबाई सखाराम,आबंडकर सुर्यकांत विश्वनाथ विजयी झाले व
चद्रंगिरी जनसेवा मंडळाचे घोलप गोरक्षनाथ बाबुराव हे विजयी झाले आहेत.
सदर निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.