ईयत्ता पहीलीच्या अकरा तुकड्या असणारी हिंद सेवा मंडळाची श्रीरामपुरातील एकमेव शाळा

ईयत्ता पहीलीच्या अकरा तुकड्या असणारी हिंद सेवा मंडळाची श्रीरामपुरातील एकमेव शाळा
बेलापुर (प्रतिनिधी )-हिंद सेवा मंडळाच्या विविध शाखामधुन जवळपास २१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असुन ईयत्ता पहीली वर्गाच्या अकरा तुकड्या असणारी महाराष्ट्रातील श्रीरामपुरची एकमेव शाळा असल्याची माहीती हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी दिली हिंद सेवा मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली असुन बेलापुरचे रणजित श्रीगोड संजय जोशी अशोक उपाध्ये अनिल देशपांडे यांची संचालक मंडळात बिनविरोध निवड झाल्याबद्दल गांवकरी मंडळ , जनसेवा पतसंस्था व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालाल लुंक्कड होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे मारुती राशिनकर उपस्थित होते या वेळी बोलताना मा .जि प सदस्य शरद नवले म्हणाले की हिंद सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने रणजित श्रीगोड यांच्या रुपाने गावाला संचालक पदाचा बहुमान दिला .
श्रीगोड हे अष्टपैलू व्यक्तीमत्व असुन त्यांच्या ज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या हिंद सेवा मंडळाला निश्चितच लाभ होईल .असेही नवले म्हणाले .या वेळी बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी ,जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालाल लुंक्कड, हिंद सेवा मंडळात बिनविरोध निवड झालेले संचालक बेलापुर पत्रकार संघाचे सदस्य रणजित श्रीगोड, उपसरपंच अभिषेक खंडागळे, जालींदर कुऱ्हे , मारुती राशिनकर, जेष्ठ पत्रकार देविदास देसाई आदिनी मनोगत व्यक्त केले .या वेळी कनजी टाक, किराणा मर्चंड असोसिएशनचे शांतीलाल हिरण, सचिन मुळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा, भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,सुधाकर खंडागळे,अँड.विजय साळुंके, संजय गोरे, रवि कोळपकर,सुभाष अमोलिक, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,प्रभात कु-हे,महेश कुऱ्हे,किशोर खरोटे ,अजिज शेख शशिकांत नवले,जनार्धन दाभाडे,दीपक क्षत्रिय,दिलीप दायमा किशोर कदम,सुभाष सोमणी,गोविंद दायमा,केदारनाथ मंत्री,भास्कर कोळसे,रमेश लगे,किरण गागरे,राहुल दायमा,इम्रान पठाण, अमित बोरुडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर प्रास्ताविक शरद नवले यांनी केले गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे यांनी आभार मानले .