गुन्हेगारी

२५  हजार रुपयाची लाच स्विकारतांना वनपरी क्षेत्र अधिकारी कटारीया यांना अटक

२५  हजार रुपयाची लाच स्विकारतांना वनपरी क्षेत्र अधिकारी कटारीया यांना अटक

संग्रामपूर, जळगाव,लाकडाने भरलेले वाहन सोडुन देण्यासाठी २५ हजार रुपयाची लाच स्विकारतांना प्रादेशीक वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी भगतराम कटारीया वर्ग २ यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडुन अटक केल्याची कारवाई आज सायंकाळी ७ वा. करण्यात आली . सदर रक्कम त्यांनी त्यांचे जळगाव जा. येथील कार्यालयात स्विकारली . संग्रामपूर – जळगाव जा. हे दोनही तालुके या कार्यालयाचे अखत्यारीत येतात . दि.१०/५/२२ रोजी वन विभागाचे कर्मचारी देवकर यांनी पातुर्डा फाट्यावर लाकडाने भरलेले टा टा वाहन पकडले व जळगाव जा. कार्यालयाचे आवारात उभे केले . सदर वाहन सोडुन देण्यासाठी कटारीया याने २५ हजाराची मागणी केली असता पंचगव्हाण येथील तक्रार कर्त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली . यावरून आज सापळा रचण्यात आला असता त्यांना २५ हजाराची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले .

 

या भ्रष्ट कटारीया अधिकार्‍यामुळे संग्रामपूर जळगाव तालुक्यात वृक्ष तोडीला उधाण आले होते . शासकीय जमीन हडपण्याची स्पर्धा कवठळ बंदीच्या जंगलात लागली होती . सदर कारवाई होताच एकलारा गावात ग्रामस्थांनी फटाके फोडुन कारवाईचा जल्लोष केला . सदर कारवाई पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड अमरावती यांचे मार्ग दर्शना खाली पोहेकॉ देविदास घेवारे अरुण सावंत एस एन चौधरी विलास साखरे मोहम्मद रिजवान रविंद्र दळवी प्रवीण बैरागी अझरूददीन काझी इ नी पुर्ण केली . या कारवाईचे दोनही तालुक्यात स्वागत होत आहे . 

संग्रामपूर/जळगाव जा. तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या येथील प्रादेशीक वनविभाग कार्यालयात (दांडगा ) अनुभव असलेले वनपरी क्षेत्र अधिकारी म्हणुन कटारीया एक वर्षापुर्वी येथे रुजु झाले . ते रुजु होताच त्यांनी पुर्णा नदी काठालगत असलेल्या शासनाच्या ९०० एकराच्या बंदीच्या जंगलात निव्वळ जमीनीची सौदे बाजी करत अतिक्रमण धारकांमधे स्पर्धा लावली . यात कटारीया यांनी स्वतः ची चांदी करून घेतली . परीणामी त्या बंदीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले .

 

म्हणुन वन्य जीवांनी तेथुन पळ काढला . याची ओरड अनेकदा पर्यावरणप्रेमी जनतेने केली असली तरी त्यांची हाकपुकार कोणी घेतली नाही . म्हणुन नियतीचे अस्तीत्व असते म्हणतात अशा संतप्त प्रतिक्रिया आज या निमित्ताने व्यक्त झाल्या .

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे