माझे माहेर पंढरी. माऊलीच्या पालखी सोहळा निमीत्त महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातून दिंडी वारकरी आळंदीत दाखल*
*माझे माहेर पंढरी. माऊलीच्या पालखी सोहळा निमीत्त महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातून दिंडी वारकरी आळंदीत दाखल*
*दि २१ रोजी माऊलींचे होणार पंढरपूर साठी प्रस्तान*
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्या साठी आळंदी नगरीत वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात दाखल होत आहेत.
*चला आळंदीला जाऊ….ज्ञानदेव डोळा पाहू* म्हणत विठ्ठल नाम घेत वारकरी पवित्र आळंदी येथे दाखल होताना गजबज पाहायला मिळत आहे.
वारकरी बांधवांसाठी टाळ मृदंगाची दुकाने सजली आहेत.
आळंदीनगरीच्या आजूबाजच्या परिसरात वारी साठी दुकाने सजली आहेत.
सुमारें दोन वर्षाच्या कालवधीनंतर माऊलींचे प्रस्थान पायी वारी ने होत आहे. कोरोना मुळे एस टी महामंडळाच्या विषेश बस ने माऊलींच्या पादुका पंढरी वारी साठी होत होते. आता वारकरी पायी चालत पंढरी ला जाण्या साठी अतुर आहे . विठू रायाचे दर्शन घेऊन तृप्त होण्या साठी वारीत निघाला आहे .
*भेटी लागी जीव…… लागलीसे आस*… ही पंढरीची ओढ वारकर्यांच्या डोळ्यात दाटून आली आहे ती सहज दिसून येत आहे पोलिस यंत्रणा सज्ज आहे तसेच आळंदी नगर परिषदेने पाणी पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेत . जास्तीचे पाण्याचे टँकर मागवून घेतले आहेत .मुख्य चौकात ते उभे राहतील अश्या सुचना आळंदी नगरपरिषद कार्यालय मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले आहे. तसेच इंद्रायणी नदी चे पाणी आणि आळंदी शहरातील विहिरी चे पाणी पिणे बाबत निर्बंध घालण्यात आले आहे हे पूर्वीच आळंदी पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले आहे