गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पिस्तूलचा धाक दाखवून बस चालकाला गोळ्या घालण्याची धमकी देणारा आरोपी जेरबंद

पिस्तूलचा धाक दाखवून बस चालकाला गोळ्या घालण्याची धमकी देणारा आरोपी जेरबंद.

 

 

 

टाकळीभान येथे दि. 30/09/2022 सकाळी 10 वाजेचे सुमारास औरंगाबाद ते शिर्डी जाणारी बस क्रमांक MH 40 BL 4180 श्रीरामपूर कडे येत असताना टाकळीभान शिवारात वीट भट्टीजवळ स्विफ्ट कार क्र. MH16 AB 4046 मधील आरोपीने बसला गाडी आडवी लावून स्विफ्ट कारला कट का मारला ? या कारणावरून आपले जवळील पिस्टल काढून बस चालकावर रोखले व जीवे मारण्याची धमकी दिली बस मध्ये प्रवास करत असलेले पो. कॉ.विलास उकिरडे यांनी समय सूचकता दाखवत सदर घटनेची माहिती तात्काळ Dysp संदीप मिटके यांना दिली त्यानुसार त्यांनी लागलीच आपले पथकासह रवाना होत टाकळीभान परिसरात स्विफ्ट कार चा सिने स्टाईल पाठलाग करत स्विफ्ट कार क्र.MH16 AB 4046 सह आरोपी नामे लक्ष्मण शिवाजी आरे वय 32 वर्ष रा.गुलटेकडी, मार्केट यार्ड पुणे, यास पिस्टलसह जेरबंद केले .

             सदर घटनेत आरोपी बस चालकावर फायरिंग करण्याची धमकी देत असल्याने बस मधील प्रवासी भयभीत होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. Dysp संदीप मिटके यांनी प्रसंगावधान ओळखून आरोपीस शिताफिने जेरबंद केल्याने पुढील अनर्थ टळला व बस मधील प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला व सदर कारवाईबाबत त्यांचे व त्यांच्या पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले. आरोपी विरुद्ध श्रीरामपूर तालुका पो.स्टे. येथे बस चालक संजय फ्रान्सिस गायकवाड यांचे फिर्यादीवरून गुन्हा क्र.359/2022 भारतीय दंड संहिता कलम 353,341,186,504,506 शस्त्र अधिनियम 3/25 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर,यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , psi बोरसे, Hc सुरेश औटी,Hc भारत जाधव, Pc विलास उकिरडे यांनी केली.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे