माऊलींची पालखी पद्मावती मातेच्या दर्शनाला*

*माऊलींची पालखी पद्मावती मातेच्या दर्शनाला*
*नवरात्रीची आज पाचवी माळ*
आळंदी (दि. 30 )आदिशक्तीचा जागर सर्वत्र दिसून येत आहे श्री तीर्थक्षेत्र आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पाचव्या माळे ला पद्मावती माता दर्शनाला जाण्याची परंपरा आहे. माऊलींच्या मंदिरातून सायंकाळी पालखी निघून पद्मावती मातेचे दर्शनाला जाऊन हजेरी मारुती मंदिरात हजेरी देत पुन्हा एकदा माऊलींच्या समाधी मंदिरात जात असते. चार दिवसानंतर दसरा हा शुभ मुहूर्त हिंदू धर्मशास्त्रात महत्त्वपूर्ण मानले गेलेला साजरा होत आहे. वंशपरंपरेने माऊलींची पालखी आळंदीतून निघून पद्मावती मातेचे दर्शनाला जाण्याची जुनी परंपरा आहे. आणि पाचव्या माळेला ही परंपरा साजरी केली जाते.भाविक भक्त मोठ्या मनोभावे या पालखी बरोबर सहभागी होऊन चालत असतात.
सनई आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणात ही पालखी अलंकापुरी प्रदक्षिणा घालत मंदिरात विसावत असते.आज माऊलींचा गजर करत पालखी बरोबर असलेले भाविक लीन होताना दिसले