श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनच्या नियोजित कार्यक्रमानुसार मार्गदर्शनपर कार्यक्रम
श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनच्या नियोजित कार्यक्रमानुसार मार्गदर्शनपर कार्यक्रम
टाकळीभान प्रतिनिधी टाकळीभान येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनच्या नियोजित कार्यक्रमानुसार मार्गदर्शनपर कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान येथे घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत विद्यालयाचे प्राचार्य इंगळे बी.टी.यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पीआय मच्छिंद्र खाडे , पीएसआय संजय निकम, पीएसआय अतुल बोरसे, आणि पीएसआय श्रीम. सुरेखा देवरे मॅडम, सा, फौ ,शरद गायमुखे आदि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पीएसआय सुरेखा देवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम, पोक्सो कायदा 2012,आणि स्पर्धा परीक्षा याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पीएसआय संजय निकम आपल्या मार्गदर्शनात परिस्थितीला आपल्या अपयशाला कारणीभूत धरू नये . फक्त जिद्द व चिकाटी ठेवल्यास यश आपोआपच मिळते. आरोग्य सेवक चांदणे यांनी मोबाईल वापरायचे तोटे व दुष्परिणाम याविषयी मारगदर्शन केले ,तसेच एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन, गौरव करण्यात आला,
या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम बोरुडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल कडू ,कुमार कानडे ,हे काँ मोहन शिंदे ,अनिल शिंगाडे ,रवींद्र पवार आर.बी.आरोग्यसेवक, चांदणे एस.बी.,श्रीम. तोरणे एस .पी., आरोग्य सेविका आणि पत्रकार दिलीप लोखंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. चाबुकस्वार मॅडम यांनी केले तर श्री. पाचपिंड ए. ए. यांनी केले.