एमपीएससी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या टाकळीभानच्या कन्या स्वरुपा धुमाळ व सी.आय.एस.एफ मधून ३८ वर्ष आणि ४ महिने फायर ब्रिगेड म्हणून कार्य करत सेवानिवृत्त होत असलेले मच्छिंद्र कोकणे यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारच्या वतीने सत्कार समारंभ

एमपीएससी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या टाकळीभानच्या कन्या स्वरुपा धुमाळ व सी.आय.एस.एफ मधून ३८ वर्ष आणि ४ महिने फायर ब्रिगेड म्हणून कार्य करत सेवानिवृत्त होत असलेले मच्छिंद्र कोकणे यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला ,
टाकळीभान गावच्या कन्या स्वरुपा धुमाळ यांची एमपीएससी स्पर्धा परीक्षा अंतर्गत सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक पदी निवड तसेच गावातील सुपुत्र मच्छिंद्र कोकणे यांनी देश सेवेसाठी सी.आय.एस.एफ मध्ये तब्बल ३८ वर्ष कर्तव्य बजावले ही बाब गावासाठी अभिमानाची तसेच सर्वांनी आदर्श घेण्याजोगी बाब असल्याचे मत बाजार समितीचे संचालक मयुर पटारे यांनी व्यक्त केले.
यावेळी धुमाळ यांचा जेष्ठ नेते माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके व तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब बनकर यांच्या हस्ते तसेच कोकणे यांचा शिवाजी शिंदे व माजी उपसरपंच भारत भावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना स्वरुपा धुमाळ यांनी भावूक होत आपले आई-वडील सुप्रिया आणि प्रकाशराव धुमाळ व गावातील जेष्ठ नागरीकांच्या आशीर्वादाने हे यश संपादन करता आले असल्याचे सांगितले व सत्कार केल्याबद्दल आभार मानले.
सेवानिवृत्त अधिकारी मच्छिंद्र कोकणे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्व गोष्टींवर मात करून व वेळप्रसंगी आपल्या परीवारापासून तब्बल ३८ वर्ष देशासाठी कर्तव्य बजावले असल्याचे सांगितले.
यावेळीलोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी दोन्ही सत्कारमूर्ती यांचे कौतुक करत उपस्थित सर्वांच्या वतीने अभिनंदन केले.
यावेळी बाजार समितीचे संचालक विलास दाभाडे, कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन दत्तात्रय नाईक, कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे, भाजपच्या जिल्हा महिला सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, रावसाहेब वाघुले, ग्रामपंचायत सदस्य सुनील बोडखे, शिवाजी धुमाळ, प्रकाश धुमाळ, बाजार समितीचे सचिव दिनकर पवार, तुकाराम बोडखे, बाबासाहेब लोखंडे, उत्तम पवार, महेश लेलकर, महेंद्र संत, एकनाथ पटारे, मोहन रणनवरे, पत्रकार दिलीप लोखंडे, बापूसाहेब नवले, अर्जुन राऊत, सुभाष ब्राम्हणे, अशोक पवार, पंकज पटारे, गोटिराम दाभाडे, किशोर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.