तलाठी व ग्रामसेवक गाव पातळीवर शासनाचे दोन डोळे असून.

तलाठी व ग्रामसेवक गाव पातळीवर शासनाचे दोन डोळे असून.
तलाठी व ग्रामसेवक गाव पातळीवर शासनाचे दोन डोळे असून त्यामुळे यांनी एकल महिला निराधार महिलांचा सर्वे करून शासन दरबारी अहवाल पाठवून एकल महिला कोणत्या योजनेत बसवता येईल यासाठी या दोघांनी महिलांना सहकार्य करावे असे आवाहन मिशन वासल्य जिल्हा समितीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद कुमार साळवे यांनी केले
टाकळीभान येथे संत सावता महाराज मंदिरात एकल महिला संघटनेची शासनाच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली होती त्यावेळी साळवे बोलत होते
महिलांना मार्गदर्शन करताना सावळे पुढे म्हणाले की एकल महिलांच्या समस्या मोठ्या असून शासनाच्या विविध योजनांची त्यांना माहीत नसते त्यामुळे यांना लाभापासून वंचित राहावे लागते त्यामुळे तलाठी व ग्रामसेवकांनी अशा निराधार महिलांचा सर्वे करून त्यांना शासनाच्या योजना लाभ मिळवून दिला पाहिजे तसेच एकल महिला ला धारकांच्या मुलाची वय मर्यादा अठरा वर्षावरून पंचवीस वर्षे करण्यात यावी यासाठी मंत्रालयात प्रयत्न चालू आहे तसेच निराधार मुलांच्या संगोपनासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांचे मानधन 1100 रुपये वरून 2100 रुपये करण्या साठी शासन दरबारी यश आले
यावेळी भाजपाचे पंचायत राज व ग्रामविकास जिल्हा संयोजक नारायण काळे म्हणाले की भाजपाच्या पक्षाच्या वतीने गावातील गरजू महिलांना संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, दुबार व नवीन कुपन तसेच उज्वला गॅस अशा अनेक उपक्रम राबवून महिलांना शासनाचा लाभ मिळवून दिला असून यापुढे गरजूंना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भविष्यात मोठा लढा देणार असे काळे यांनी सांगितले
याप्रसंगी मिलिंद कुमार साळवे यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी एकच महिला संघटनेच्या अध्यक्षा मंगल जाधव, उपाध्यक्षा मंगल खरात, अरुणा पाबळे, अंजली पाबळे, मीरा गलांडे, सुनिता शिरसाट, अनिता लोखंडे, द्रोपदाबाई भारस्कर, किलोतमा शिंदे, सावित्रीबाई चांडे, बबन बाई गांगुर्डे सीताबाई शिंदे आशाबाई बनकर, लताबाई पटारे अशा एकूण 150 महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या