नोकरी
टाकळीभानचे मंडलाधिकारी प्रशांत ओहोळ यांना निवडणूक कार्यकाळातील उत्कृष्ट कामगिरीबदल पुरस्कार

टाकळीभानचे मंडलाधिकारी प्रशांत ओहोळ यांना निवडणूक कार्यकाळातील उत्कृष्ट कामगिरीबदल पुरस्कार
टाकळीभान प्रतिनिधी-: २५ जानेवारी १५ वा राष्ट्रीय मतदार दिवस यानिमित्त श्रीरामपूर विधानसभा सार्वजनिक निवडणूक- २०२४- २५ अंतर्गत घेण्यात आलेल्या दिव्यांग मतदार आणि ८५ वयोगटावरील गृह मतदान प्रक्रिया या अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल टाकळीभान येथील मंडलाधिकारी प्रशांत सुशिम ओहोळ यांना मतदार नोंदणी अधिकारी २२० श्रीरामपूर मतदारसंघ यांच्यावतीने विभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत पाटील व श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल तहसील व मंडला अधिकारी कार्यालयतील अधिकारी, कर्मचारी वृंद, तलाठी, कोतवाल, व शासकीय कर्मचारी संघटना यांच्या वतीने ओहोळ यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. व त्यांचे या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.