*न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ची राज्यस्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनासाठी निवड*

*न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ची राज्यस्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनासाठी निवड*
५२वे जिल्हास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन नुकताच विरगाव तालुका अकोले जिल्हा संगमनेर येथे संपन्न झाले. श्रीरामपूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज श्रीरामपूर येथील विद्यार्थी चि.अनिश जितेंद्र खैरनार यांनी सहावी ते आठवी या गटात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत प्रदूषणापासून शाई तयार करणे, ही संकल्पना त्याने प्रदर्शनात सादर केली होती. प्रदूषणावर यशस्वीरित्या मात करून,प्रदूषित घटकांचे उपयोजन या प्रकल्पात सादर केले. अहिल्यानगर माध्य. जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी श्री अशोकजी कडूस, जिल्हा गणित अध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजयकुमार निकड,जिल्हा विज्ञान अध्यापक संघटनेचे अध्यक्ष श्री बद्रीनाथजी शिंदे,जिल्हापरिषद शिक्षण अधिकारी प्राथ. अहिल्यानगर भास्कर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चि.अनिश खैरनार यास गौरविण्यात आले. जिल्हा स्तरावर उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल त्याची दिनांक २८ जाने.ते १ फेब्रु.दरम्यान अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे. या प्रकल्पसाठी विज्ञान शिक्षिका सौ नम्रता वर्मा मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल श्रीरामपूर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम.साईलता सामलेटी,तालुक्यातील सर्व शिक्षक, विविध संघटनांचे पदाधिकारी,ग्रामस्थ मंडळ,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे, सेक्रेटरी प्रतीक्षित टेकावडे,खजिनदार जन्मेजय टेकावडे,गव्हर्निंग कौन्सिल सुरेश ओझा, अॅड.दादासाहेब औताडे,प्राचार्य श्री घोगरे सर यांनी अभिनंदन केले आहे.