श्रीराम असंघटित बांधकाम कामगार संघटनेची स्थापना नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी व सत्कार संपन्न

श्रीराम असंघटित बांधकाम कामगार संघटनेची स्थापना नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी व सत्कार संपन्न
टाकळीभान प्रतिनिधी-: बांधकाम कामगारांना भविष्यामध्ये पेन्शन लागू करण्यासाठी श्रीराम असंघटित कामगार संघटनेमार्फत लढा उभा करावा लागेल असे प्रतिपादन श्रीराम असंघटित कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी व सत्कार कार्यक्रम प्रसंगी मा. आ. भानुदास मुरकुटे यांनी केले.
बांधकाम कामगार नेते गणेश छल्लारे यांनी बांधकाम कामगार यांचे संघटन करून श्रीराम असंघटित बांधकाम कामगार संघटनेची स्थापना केली व या संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच निवडी व सत्कार समारंभ अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मा. आ. भानुदास मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली अशोक सह. सा.कारखाना कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी युवा नेते नीरज मुरकुटे व श्रीराम असंघटित कामगार संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या नूतन बांधकाम कामगार संघटनेमध्ये, गणेश उर्फ किशोर छल्लारे (संस्थापक अध्यक्ष-श्रीराम असंघटित कामगार संघटना) संदीप शेरमाळे (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) राहुल वाघ (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) ऍड.अण्णासाहेब मोहन(महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार) दीपक नवगिरे (महाराष्ट्र राज्य सचिव) जयश्री शिंदे (जिल्हाध्यक्ष- अ. नगर ) डॉ. राजकुमार कांबळे (छ. संभाजी नगर मराठवाडा जिल्हा अध्यक्ष) बाबासाहेब घाटकिसाळे (जिल्हा उपाध्यक्ष) प्रवीणराव फरगडे (जिल्हा सल्लागार) ज्ञानेश्वर हारदे (जिल्हा सचिव) गणेश धोत्रे (जिल्हा सरचिटणीस) पत्रकार दिलीपराव लोखंडे ( जिल्हा प्रसिद्धीप्रमुख) अशोक कार्ले (जिल्हा संघटक अ.नगर) केशवराव आसने (श्रीरामपूर तालुका अध्यक्ष)राहुल लिहिणारे (श्रीरामपूर शहराध्यक्ष) संदीप कांबळे (श्रीरामपूर शहर संघटक) प्रताप लोखंडे (श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष) दत्तात्रय जानवराव (तालुका सचिव)राहुल गायकवाड (ता. सह. सचिव) परमेश्वर रवताळे (ता. सरचिटणीस)(पत्रकार हरिभाऊ बिडवे (श्रीरामपूर ता. प्रसिद्धीप्रमुख) ज्योती सोमवंशी (वैजापूर शहर अध्यक्ष) आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. कार्यक्रम प्रसंगी बांधकाम कामगारा संदर्भात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बांधकाम कामगार सेवकांचा सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी मा. आ. भानुदास मुरकुटे मार्गदर्शन करताना म्हणाले की या संघटनेद्वारे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांची नोंदणी करून विविध शासकीय योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना या संघटनेने द्यावा व बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढावे तसेच बांधकाम कामगारांना पेन्शन लागू व्हावी यासाठी शासन दरबारी या संघटनेने प्रयत्न करावे असे ते म्हणाले.यावेळी मुरकुटे यांनी नूतन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व बांधकाम कामगारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आवाहन केले.
यावेळी गणेश छल्लारे म्हणाले की लढवय्ये नेते मा. आ. भानदास मुरकुटे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कठिबद्ध असून विविध शासकीय योजनांचा लाभ या संघटनेमार्फत प्रत्येक बांधकाम कामगार यांपर्यंत पोहोचवणार असून बांधकाम कामगारांच्या प्रश्नांसाठी, हितासाठी सदैव लढा सुरू ठेवणार असल्याचे म्हणाले.