कॉलेज परिसरात घिरट्या घालणाऱ्या रोड रोमिओंवर गुन्हे दाखल करा – संदीप कुसळकर

कॉलेज परिसरात घिरट्या घालणाऱ्या रोड रोमिओंवर गुन्हे दाखल करा – संदीप कुसळकर
सोनई-राहुरी रोडवर कॉलेज परिसरात भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्या रोडरोमिओंवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सोनईचे माजी उपसरपंच संदीप कुसळकर यांनी सोनई पोलिसांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले, राहुरी रोडवर सोनई गाव ते मुळा पब्लिक स्कूलपर्यंत अनेक ठिकाणी अनोळखी व्यक्ती घोळक्याने विनाकारण उभे राहतात. तसेच दुचाकी वाहने भरधाव वेगाने चालवितात. राहुरी रोडवर शाळा,
कॉलेज असल्याने विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शनैश्वर हायस्कूल भरण्याअगोदर व सुट्टीच्या वेळी त्याचबरोबर शनैश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उच्च तंत्रशिक्षण महाविद्यालय सोनई कॉलेज परिसरात सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजता सुट्टीच्या वेळेपर्यंत रोडरोमिओंची मोठी गर्दी झालेली असते. त्यातून काही मुलींना छेडछाडीचे अनुचित प्रकार होत आहेत. त्याचबरोबर काही अल्पवयीन मुली या रोड रोमिओच्या आमिषाला व भूलथापांना बळी पडून पलायन करतात. त्यामुळे पालकांना मनः स्ताप होत आहे.