राहुरी फॅक्टरी येथील sbi एटीएम च्या बॅटऱ्या चोरणारी 3 आरोपींची टोळी 24 तासात जेरबंद.

राहुरी फॅक्टरी येथील sbi एटीएम च्या बॅटऱ्या चोरणारी 3 आरोपींची टोळी 24 तासात जेरबंद.
आरोपीस प्रथम पाच दिवस व नंतर तीन दिवस असा पोलीस कस्टडी रिमांड पोलीस कस्टडी दरम्यान दोन लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त
*आरोपीस प्रथम पाच दिवस व नंतर तीन दिवस असा पोलीस कस्टडी रिमांड पोलीस कस्टडी दरम्यान दोन लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त*
एकूण पाच गुन्हे उघडकिस दिनांक 18/01/2025 रोजी पहाटे च्या वेळेला राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी येथील एसबीआय बँकेचे एटीएम मधील एटीएमच्या 14 बॅटऱ्या 70000 रुपये किमतीच्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. त्यासंदर्भात राहुरी पोलीस स्टेशन येथे 31/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांनी तातडीने तपास पथक नेमले होते. सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम यांनी तांत्रिक विश्लेषण करून व गोपनीय माहिती घेऊन आरोपी निष्पन्न करून आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक या पोलीस पथकाच्या मदतीने नाशिक येथून आरोपी 1) प्रवीण मोतीराम अंभोरे राहणार सस्ती तालुका पतुर जिल्हा अकोला 2) भगवान विश्वनाथ सदार राहणार चतारी,तालुका पतुर, जिल्हा अकोला .
यांना दिनांक 19 1 2025 रोजी अटक केले व त्यांची सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आरोपी 3)राकेश गया प्रसाद यादव राहणार नांदूर गाव नाशिक यास दिनांक 23.1.2025 रोजी अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपीकडून राहुरी पोलीस स्टेशन कडील चोरीस गेलेल्या बॅटरींपैकी 7 बॅटऱ्या व कोपरगाव पोलीस स्टेशन , लोणी पोलीस स्टेशन , राहता पोलीस स्टेशन , धरणगाव पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव यांच्या हद्दीतून आरोपींनी चोरलेल्या 21 बॅटऱ्या अशा एकूण 28 बॅटऱ्या सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या आरोपींकडून हस्तगत करून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहे.
सदर कारवाई राकेश ओला पोलिस अधीक्षक ,अहिल्यानगर, वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहिल्यानगर, बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन,पोहेकों बाबासाहेब शेळके, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, अमोल भांड व पोलीस निरीक्षक हिरे, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवळी, नितीन फुलमाळी, वाल्मीक चव्हाण, जितेंद्र वजीरे, नेमणूक गुन्हे शाखा नाशिक युनिट क्रमांक दोन यांनी केलेली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण बागुल हे करत आहेत.