साथ मरेंगे म्हणत प्रेमीयुगलांनी सोबत गळफास घेतला, तरुणाचा मृत्यू, तर दोर तुटल्याने विवाहित महिला वाचली
साथ मरेंगे म्हणत प्रेमीयुगलांनी सोबत गळफास घेतला, तरुणाचा मृत्यू, तर दोर तुटल्याने विवाहित महिला वाचली
साथ मरेंगे म्हणत प्रेमीयुगलांनी सोबत गळफास घेतला, तरुणाचा मृत्यू, तर दोर तुटल्याने विवाहित महिला वाचली
गेवराई तालुक्यातील घटना
गेवराई : तीस वर्षीय विवाहीत महिलेसोबत फेसबुकवरुन प्रेम जुळवून आलेल्या सत्तावीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भेंड बुद्रुक ( ता.गेवराई ) येथे सोमवार दि.१७ रोजी पहाटे घडली. जयपाल लक्ष्मण वाव्हळ वय २७ , रा.भेंड बुद्रुक, ता.गेवराई असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
या युवकाचे कल्याण येथील तीस वर्षीय विवाहित महिलेसोबत फेसबुकवरुन प्रेम जुळवून आले. दोन दिवसांपूर्वीच ही विवाहीत महिला भेंड बुद्रुक येथे आली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील भेंड बु.येथील मयत जयपाल याचे कल्याण येथील एका तीस वर्षीय महिलेसोबत फेसबुकवर प्रेमसंबंध जुळून आले. दोन दिवसांपूर्वीच सदरील महिला कल्याण येथून भेंड येथे आली होती. दरवर्षी रविवारी दि. १६ रोजी सदरील महिलेला पतीने फोन करून गुन्हा दाखल करील असे या विवाहीत महिलेस बजावले असता भीतीपोटी साथ मरेंगे या इराद्याने रविवारी मध्यरात्रीनंतर सोमवार दि.१७ रोजी पहाटे घरातील आडुला या प्रेमी युगलाने गळफास घेतला.
यावेळी विवाहीत महिलेचा दोर तुटला. मात्र जयपाल वाव्हळ याचा यामध्ये मृत्यू झाला. या बाबत तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सपोनि प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. डी. कुवारे पुढील तपास करित आहेत.