देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
टाकळीभान विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
टाकळीभान विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल अण्णासाहेब पठारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
मंगळवार दिनांक 21 जून रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच विविध योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे. ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्त्व पटवून देणे ही काळाची गरज आहे. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस तर दक्षिण गोलार्धातील सर्वात लहान दिवस असतो. याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योग विषयीचे ज्ञान जगासमोर आणले म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अध्यात्मिक संस्कार रुजविण्याचे कार्य श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक माधुरी प्रदीप खेले आर्ट ऑफ लिव्हिंग टिचर,सौ. हिरा कैलास महाले, आर्ट ऑफ लिव्हिंग पवित्रा टीचर,प्रदीप प्रभाकर खेले, तेजस प्रदीप खेले,श्रेयस प्रदीप खेले,विद्यालयाचे प्राचार्य मा श्री इंगळे बी.टी.यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले यावेळी योग दिना निमित्ताने विविध कृती करण्यात आल्या पूरक हालचाली ,विविध आसने ,प्राणायाम ,ध्यानधारणा, ओमकार, योगा संकल्प,प्रार्थना आदी हालचाली व कृती करण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी यात आनंदाने सहभाग घेऊन कृती केली. यामध्ये विद्यालयाचे सर्व शिक्षक ज्युनियर कॉलेजसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
एकूण चाळीस मिनिटे हा कार्यक्रम साजरा झाला.
Rate this post