*आदेश पालन सिद्धांत पद्धती संपुष्टात आल्याने कौटुंबिक कलाहात वाढ*
*आदेश पालन सिद्धांत पद्धती संपुष्टात आल्याने कौटुंबिक कलाहात वाढ*
एक काळ असा होता कि कुटुबांत कलह आहे अस कुटुंब शोधुन देखिल सापडत नव्हतं. आज काळ बदलला आहे त्यामुळे कलह नाही असं कुटुंब अस्तित्वात नाही. सगळीकडे कलहच कलह आहे मग नांत कोणतही असो ,आई वडील,पती,पत्नी मुलं,भाऊ,भाऊ, बहीण भाऊ, कोणाचेही विचार कोणाशी जुळायला तयार नाहीत. याचा परिणाम स्वरूप कलह वाढले मग नेमकं कसं असं काय बदल झाला कि एवढी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.साधारणतःसिद्धांत म्हणजे काय तर एखादया विषयातील अथवा विषया संदर्भातील अलिखित नियम ज्यांचं पालन लिखित आदेशापेक्षाही काटेकोर पणे इमानेइतबारे होईल असा आदेश पालन सिद्धांत पद्धती हि जो पर्यंत भारतीय समाज व्यवस्थेत रूढ अस्तित्वात होती .तो पर्यंत कुटुंब संस्था ही प्रचंड प्रमाणात मजबूत होती .आज प्रत्येकाला आदेश देण्याची इच्छा निर्माण झाली आहे. पण आदेश पालन करण्यासाठी कोणीही तयार नाही . आदेश पालन सिद्धांत हि पद्धत संपुष्टात आल्याने आदेश पालन करण्यासाठी कोणीही तयार असल्याचं आढळतं नाही. त्याचे विपरीत परीणाम म्हणून कुटुंब संस्था खिळखिळ होऊन मोडकळीस आली आहे.आज कुटुंब हे फक्त नावाला शिल्लक रहिल आहे. प्रत्येकाला स्वतःच स्वतंत्र अस्तित्व अपेक्षित असल्याने कुटुंबांची व्याख्या दिवसेंदिवस लहान होत चालली आहे. त्या काळी कुटुंब प्रमुख व्यक्ती हाच एकमेव प्रमुख असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य हे बिनबोभाट पणे आदेशाच पालन करत . कुटुंब प्रमुख यांच्या तोंडातून जो शब्द निघाला तो कायदा असल्या सारखा असायचा. त्या शब्दांना आदेशाला कोणीही कुटुंबातील सदस्य विरोध दर्शवत नसतं . सर्वांची मुक संमती मिळत असे इच्छा आसो वा नसो आदेश पालन करणं क्रमप्राप्त होतं . आदेश पालन सिद्धांत पद्धती चा फायदा हाच होता कि कुटुंब मजबुत सशक्त आणि अज्ञाधारक होत . कौटुंबिक कलह हा विषय अस्तित्वात नव्हताच .आई वडील मुलं आजी आजोबा चुलते मालते चुलत बहीण भाऊ असं भल मोठं दांडग कुटुंब असलं तरीही एकाच व्यक्तिचा आदेश अंतिम असायचा तो आदेश सिद्धांत समजुन लक्ष्मण रेषा म्हणून त्याचं कोणीही उल्लंघन करत नसे . म्हणुन कुटुंब हे मजबूत आणि कलहविरहीत असायचं.आज काय स्थिती आहे तर मुलं आई वडीलांच्या आज्ञेत नाहीत .कोणीच कोणाच ऐकायला तयार नाही. प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धी नुसार आपल् स्वतःच आयुष्य जगण्यात स्वारस्य आहे. मग सिद्धांत, शब्द, प्रमाण हे सगळं कालबाह्य झाल आहे.आई वडील,मुलं पती पत्नी प्रत्येकाला मत आहे . प्रत्येकाची भुमिका आहे.आपण स्वतः ज्ञानी आहेत हा प्रत्येकाचा समज आहे.मग आपण ज्ञानी आपल्याला समजतं तर दुसर्याच कशासाठी ऐकायचं म्हणजे आदेश वगैरे सिद्धांत पालन हि काहिच गरज नाही असं प्रत्येकाचं मत झालंय त्या मुळे आदेश पालन सिद्धांत पद्धती कालबाह्य झाली.कदाचित हि पद्धत उपयोगी नाही असं तंत्रज्ञान युगातील पिढीला वाटत असेलही म्हणून हि पद्धत बंद झाली . आदेश पालन सिद्धांत पद्धती संपुष्टात येण व कौटुंबिक कलह निर्माण होण्यास आरंभ होण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.आजही कुटुंब प्रमुखाचा आदेश पालन सिद्धांत पद्धती पुन्हा चालू झाली तर कौटुंबिक कलह संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाहीत.आजही फक्त तो मुळ विचार सिद्धांत स्वीकारायचा आहे. जो आपल्या कुटुंबाच्या समाजाच्या राष्ट्राच्या हितासाठी लाभादयी ठरेल .आपण तो मुळ विचार आणि आपल्या संसकृतीचा पाया बाजुला सोडला म्हणून हि दयनीय अवस्था आपल्याला विद्यमान स्थितीत पाह्यला मिळत आहे.आपले विचार ज्ञान हुशारी प्रचंड आहे पण ती कोणाच्या तरी अज्ञेत असल्याशिवाय लाभादायी ठरणार नाही.हेच विचार आत्मसात करुन अंमलात आणण्याची गरज आहे . जेणेकरून पुन्हा किमान सध्याचं छोटेखानी कुटुंब तरी कलह मुक्त होईल.