तरुणाई कडून लोकशाही उत्सवाची जनजागृती सुशिक्षित तरुणांचे कौतुकास्पद अभियान
तरुणाई कडून लोकशाही उत्सवाची जनजागृती सुशिक्षित तरुणांचे कौतुकास्पद अभियान
मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो.. या सुभाषिताचे अजरामर महत्त्व आहे. विधानसभेच्या निवडणुका दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राज्यभर होणार आहेत. या लोकशाहीचे उत्सवाचे जनजागृती पर अभियान अजिंक्य डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज लोहगाव यांचे वतीने युवक तरुण-तरुणी यांच्यावतीने आळंदी शहरात राबवण्यात आले. भारतीय सार्वभौमत्व हे लोकशाहीवर टिकून आहे आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी मतदान गरजेचे आहे. याचे महत्व मतदारांना पटवून देण्यासाठी आळंदी शहरांमध्ये लोहगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या तरुण-तरुणींनी जनजागृती अभियान उत्साहात राबवले. आळंदी शहरातील भाविक नागरिक सर्व मतदारांना मतदान करणे किती गरजेचे आहे मतदानाची ताकद काय याची महत्त्व पटवून देताना तरुणाई दिसली. या उल्लेखनीय अभियानाची कौतुकास्पद कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे मतदान टाळता कामा नये मतदान हा आपला हक्क आहे याचे महत्व तरुणाई लोकांना समजून सांगत आहे आणि या जनजागृतीच्या माध्यमातून मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या सुभाषिताचे महत्त्व पटवून देताना आळंदी शहरांमध्ये तरुणाई दिसून आली. येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्याचे भवितव्य मतदारांच्या मतदानाने मतपेटी मध्ये बंद होणार आहे. त्या माध्यमातून डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या तरुण-तरुणींचे समाज उपयोगी अभियान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे यात शंका नाही