हिजाब परिधानवरून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कारवाई.पो. निरीक्षक प्रताप दराडे
हिजाब परिधानवरून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कारवाई.पो. निरीक्षक प्रताप दराडे
हिजाब परीधानवरून सुरू असलेल्या वादासंदर्भात सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्य टाकून सामाजीक तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये असे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.
कर्नाटक राज्यात घडलेल्या घटनेसंदर्भात राहुरीचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी राहुरी तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले की, सामाजिक तेढ निर्माण करणारे कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य किंवा घोषणा करू नये.
सोशल मीडियावर कुठल्याही आक्षेपार्ह प्रकारची पोस्ट व्हायरल अथवा व्हिडिओ व्हायरल करू नये.जर कोणीही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा पोस्ट वायरल करत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावे जेणेकरून पोलीस विभागातर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जर कोणीही चुकीचे कृत्य करताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक दराडे यांनी म्हंटले आहे.