सारेगमप उपविजेता जयेश खरेचा वांजूळपोई ग्रामस्थांकडून सन्मान भव्य दिव्य मिरवणूक काढत केला जल्लोष साजरा
भव्य दिव्य मिरवणूक काढत केला जल्लोष साजरा

सारेगमप उपविजेता जयेश खरेचा वांजूळपोई ग्रामस्थांकडून सन्मान
भव्य दिव्य मिरवणूक काढत केला जल्लोष साजरा
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथील विद्यार्थी जयेश विश्वास खरे या चिमुकल्याने झी मराठी वाहिनीवरील “सारेगमप” च्या महाअंतिम फेरीत उपविजेता म्हणून बहुमान मिळविल्याबद्दल वाळूंजपोई येथील ग्रामस्थांनी भव्य दिव्य मिरवणूक काढून जयेश व त्याच्या कुटुंबियांचा सन्मान करत त्याचे अभिनंदन केले आहे.
महाअंतिम फेरीत जयेशने लल्लाटी भंडार हे गोंधळ गीत सादर केले. कोपरगावची गौरी पगारे विजेती
ठरली तर जयेश खरे व श्रावणी वागळे उपविजेते ठरले आहेत. कार्यक्रमास विशेष पाहुणे म्हणून अनंत व आदर्श शिंद होते. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी व वैशाली माडे यांनी परीक्षण केले.
दरम्यान जयेश याने उपविजेता बहुमान मिळविल्याबद्दल वांजुळपोई ग्रामस्थांनी जयेश व त्यांच्या कुटुंबियांची भव्य दिव्य मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. यानंतर जयेश व त्याच्या कुटूंबियांचा सन्मान केला.
यावेळी गणेश डोंगरे,बाळासाहेब कोळपे ,पत्रकर विनायक दरंदले,कृष्णा राठोड सर,,बाळासाहेब बारगजे सर,सुनील महाराज पारे,महेश महाराज खाटेकर,शंकर भारस्कर,काकासाहेब शिरसाठ,एकनाथ पवार,शरद पवार,भीष्मराज पवार, दत्तू भारस्कर, श्रीरंग पवार, अप्पासाहेब पवार आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
करजगाव शाळेत वर्गात गायन करतानाचा जयेश खरे या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला संगीतकार अजय- अतुल यांनी मोठी संधी देत महाराष्ट्र शाहीर या मराठी चित्रपटात गायलेले गाऊ नको किसना हे गाणे आज प्रत्येकाच्या ओठावर आहे. तर नुकतेच नागराज मंजुळे यांच्या नाळ-२ या चित्रपटात जयेश याने गाणे गायिले आहे.