शिवम लोडे याची आंतर राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र खेलो इंडिया मानांकित केंद्र येथे प्रशिक्षणासाठी निवड ,

टाकळीभान प्रतिनिधी – शिवम लोडे याची आंतर राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र खेलो इंडिया मानांकित केंद्र येथे प्रशिक्षणासाठी निवड ,
. चि शिवम दीपक लोडे हा वडाळा महादेव, अशोक नगर फाटा येथील ग्रामीण भागातील खेळाडू आहे त्याने आतापर्यंत जिल्हास्तर राज्यस्तर राष्ट्रीय स्तर सर्व स्पर्धेमध्ये नेत्र दीपक यश संपादन केले आहे पुण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेलो इंडिया मानांकित आर्चर्स अकॅडमी येथे त्याची निवड झाली आहे या अकॅडमीने आजवर अनेक गुणवान मुलांना निवडून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धा पर्यंत पदक विजेते तयार करण्याचे कार्य केलेले आहे
मागील तीन ते चार वर्षांमध्ये शिवम हा एकमेव विद्यार्थी आहे ज्याची तिथे निवड झाली आहे त्याचमुळे निवड केली आहे. दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी सांज पाटणी विद्यालयात शिवमला आर्चरी साहित्य देण्यात आले. म्हणजेआंतर राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी उच्च दर्जाचा विदेशी बनावटीचा अंदाजे किंमत ३ लाख रुपयांचा आर्चरी रिकर्व बो ( धनुष्यबाण ) देण्यात आला. याप्रसंगी शाळेतील शिक्षक वृंद आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.
आर्चर शिवम यास हे साहित्य उपलब्ध होण्यासाठी , महाराष्ट्र राज्याचे मंत्री अहमद नगर चे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील, आणि श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे यांनी खूप सहकार्य केले आणि आशीर्वाद दिले. तसेच सांज पाटणी विद्यालयाचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री गिरीश मोडक, मानद सचिव संजय जोशी, विद्यालयाचे चेअरमन भरत कुंकूलोळ, हिंद सेवा मंडळाचे कर्मचारी पतपेढीचे संचालक महेश डावरे, मुख्याध्यापक विठ्ठल भांगरे सर, पर्यवेक्षिका मंगला डोळस मॅडम, व संजय शिंदे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे वडाळा महादेव ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश पवार, दीपक आण्णा पटारे, गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब मित्र मंडळ, श्रीरामपूर क्रिकेट क्लब मित्र मंडळ, आणि पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन परिवार मित्र मंडळाने चिरंजीव शिवम यास पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत देशासाठी नक्कीच तो मेडल काढेल अशी आशा त्याचे वडील दीपक लोडे यांनी व्यक्त केली आहे