ब्रेकिंगमहाराष्ट्र
पत्रकार दिनानिमित्त वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारित श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट च्या वतीने केला पत्रकारांचा सन्मान

पत्रकार दिनानिमित्त वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारित श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट च्या वतीने केला पत्रकारांचा सन्मान
नेवासा तालुक्यातील करजगाव येथील श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या वतीने राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वांजुळपोई तिळापुर येथील पत्रकार यांचा बोरी फाटा येथे येऊन सन्मान करण्यात आला
अहमदनगर जिल्ह्यांसह महाराष्ट्र भर अग्रेसर असलेली श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या 57 शाखा तसेच 6 लाखांहून अधिक ग्राहक असणारी एकमेव विश्वसनीय संस्था नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते त्यामुळे सामाजिक जाणीव च्या भावनेतून आज करजगाव शाखेच्या वतीने तसेच पत्रकार पोर्टल रुद्रा न्यूज डिजिटल पोर्टल तसेच जनक्रांती न्यूज डिजिटल पोर्टल मुख्य संपादक श्री.एन. डी. चोरमले, पत्रकार भाऊ कदम यांना करजगाव शाखेचे मॅनेजर तुवर साहेब व तेमक साहेब यांनी दिनदर्शिका व विचारवंतांचे पुस्तक देऊन बोरी फाटा येथे पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.