ब्रेकिंग
बिबट्या ने पाडला दोन शेळ्यांचा फडशा
बिबट्या ने पाडला दोन शेळ्यांचा फडशा
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेणवडगाव येथील शेतकरी गिरीधर अर्जुन जाधव यांच्या वस्तीवर रात्रीच्या सुमारास बिबट्याने दोन शेळ्यांना ठार मारून एक शेळी जागेवरच तर एक काही अंतरावर फरफटत घेऊन जाऊन तिच्यावर आपली भूक भागवली असे प्रत्यक्षदर्शी दिसून आले जाधव कुटुंबिय सकाळी झोपेतून उठले असता त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रथमता पत्रकार भाऊ कदम यांच्याशी संपर्क केला असता पत्रकार यांनी वनपाल अधिकारी गरुड यांना माहिती कळवली असता गरुड यांनी जागेवर येऊन पंचनामा करून बिबट्यानं हल्ला केला असल्याचे कळविले तसेच उपस्थित नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली असून लवकरच लावण्यात येईल असे गरुड यांनी नागरिकांना सांगितले