पूला मधील खड्ड्याचे काम मार्गी नाही लावल्यास नेवासा श्रीरामपूर रस्ता रोको आंदोलन करणार -वंदना मुरकुटे
पूला मधील खड्ड्याचे काम मार्गी नाही लावल्यास नेवासा श्रीरामपूर रस्ता रोको आंदोलन करणार -वंदना मुरकुटे
टाकळीभान खिर्डी गणेश खिंड रोडवर पडलेल्या खड्ड्याचे काम महिनाभरात पूर्ण न केल्यास नेवासा श्रीरामपूर रस्ता रोको करणार असा इशारा पंचायत समितीच्या मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. मंगळवार दि. 26 जुलै रोजी सकाळी १०. वाजता खिर्डी गणेश खिंड रोडला पडलेल्या भगदाडासमोर डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी परिसरातील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, नागरिक यांसमवेत दीड तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी त्या बोलत होत्या त्या म्हणाल्या की जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी या भागातील लोकप्रतिनिं या नात्याने आमच्यावर असून, वेळेवर प्रश्न सुटणार नसतील तर त्यासाठी यापुढे रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. हा रस्ता गणेश खिंड देवस्थानला जोडणारा असून, खिर्डी, वांगी, गुजरवाडी व पुढे राहुरी ला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून या रोडला नेहमी वर्दळ व गर्दी असते, दूध वाहतूक करणारे शेतकरी, शालेय विद्यार्थी, गणपतीला दर्शनासाठी जाणारे भाविक भक्त, या मोठ्या खड्ड्यामुळे दोन महिन्यापासून या रस्त्यावरील वाहतूक रहदारी बंद असून त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा रस्त्याला पडलेला खड्डा प्रवाशांसाठी धोकादायक आहे .पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हे आंदोलन करत असल्याचे सांगितले. यावेळी या पडलेल्या भगदाडा संदर्भात खिर्डी चे भाऊसाहेब पारखे यांनी या प्रश्नाला संबंधित शासकीय विभागाकडून विलंब झाला असून या पूलाचे काम त्वरित करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने केली. याप्रसंगी राजेंद्र कोकणे यांनीही हा रस्ता पंचक्रोशीतील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून शासनाने दिरंगाई करू नये असे सुनावले. सदर आंदोलन प्रसंगी शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी मा. सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी परिसरातील उपस्थित ग्रामस्था समवेत या खड्ड्यासमोर पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता महेश शेळके, कालवनिरीक्षक बाळासाहेब जपे, व सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीरामपूरचे शाखा अभियंता रणजित यांना निवेदन दिले. व अधिकाऱ्यांनी महिनाभरात खड्डे बुजवण्याचे आश्वासन आंदोलकांना, ग्रामस्थांना दिले यावेळी निवेदनावर मा. सभापती डॉ. वंदना मुरकुटे , भाऊसाहेब पारखे ,राजेंद्र कोकणे, भरत जाधव, रामभाऊ कवडे, बंडोपंत बोडखे, भास्कर तूवर, धनंजय माने, विजय बनसोडे ,बापूसाहेब साळवे, हरिभाऊ जगताप, दीपक तुवर , बापूसाहेब शिंदे,शिवाजीराव जाधव, बबन भागवत, कुंडलिक तुवर, आकाश दहे विजय तुवर, संदीप चितळकर ,सुभाष तुवर, किशोर तूवर, विलास आठरे, भाऊसाहेब जाधव, आप्पासाहेब श्रीधर, ज्ञानेश्वर तुवर आदींच्या सह्या आहेत. या आंदोलन प्रसंगी खिर्डी ,वांगी गुजरवाडी, भेर्डापूर, गणेशखिंड व परिसरातील ग्रामस्थ नागरिक शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट: एक महिन्यापर्यंत या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचे काम करणार असून, या कामाचे इस्टिमेट अंदाजे खर्च ३० लाख रुपयाचे असून मुख्य कार्यकारी अभियंता नाशिक विभागाकडे तो प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे, शंभर वर्षांपासून हा पूल जुना असून अवजड वाहनामुळे त्याला खड्डे पडले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित हा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देण्यात येईल…. श्री महेश शेळके -पाटबंधारे शाखा अभियंता श्रीरामपूर.