अपघातगुन्हेगारी

*चिमुकलीच्या विरहाचा आक्रोश. आळंदीत संताप. शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे पोलिस आणि नगरपरिषदेला निवेदन*

*चिमुकलीच्या विरहाचा आक्रोश. आळंदीत संताप. शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे पोलिस आणि नगरपरिषदेला निवेदन*

 

*निरागस परी चा मृतदेह हृदय हेलावणारी घटना*

 

आळंदीत अपघाती मृत्यू ची मालिका लागती की काय अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे, सोमवारी शाळा सुटल्यावर दुचाकीवर येणाऱ्या , तनिषा थोरवे, वय ४ वर्ष, हीचा डंपर च्या धडकेत मृत्यू झाला, आळंदीत दुसरा अपघाती मृत्यू त्यात या चिमुकली

परी चा मृत्यू आळंदी कर सहन करु शकले नाही, त्या निरागस चिमुकलीचा मृत देह पाहून मयती ला आलेल्या ग्रामस्थांचे पाय जड झाले, पुढे न जाता तो चिमुकली च्या साठीचा आक्रोश हृदय हेलावणारी घटना आळंदीकर व परिसर रहिवाशी हृदयावर दगड ठेवून अक्षरशः निघून गेले, आक्रमक होत आळंदी शहर राष्ट्रवादी काँगेस ने आक्रमक पवित्रा घेतला, रोहन कुऱ्हाडे पाटिल खेड तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष यांनी निवेदन देण्या साठी आवाहन केले आणि आज प्रदेश प्रतिनिधी डी डी भोसले पाटिल, आणि माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटिल यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषद आणि पोलिस यांना वरिल मान्यवर यांनी जाब विचारला आहे, याबाबत बोलताना डी डी भोसले पाटिल आणि प्रकाश कुऱ्हाडे पाटिल आक्रमक झाल्याचे दिसले,गतिरोधक बसवा,भरधाव वाहने यावर गुन्हे दाखल करा, बेकायदेशीर वाहतुकीस शिस्त लावली जावी, आळंदी ग्रामीण रुग्णालय येथील रस्त्यावरील, भाजी विक्रीचे अतिक्रमण, आदी विषया वर वेसण घातले जावे तसे निवेदन देत कारवाईची मागणी केलीय, चिमुकलीच्या अपघाताने मृत्यू ची घटना हि नागरिकांच्या नागरिकांच्या भावनांचा उद्रेक करू शकते याचाही इशारा देण्यात आलाय,गेल्या आठ दिवसात आळंदी शहरात दोन दुर्दैवी अपघाती मृत्यू झाले, नागरिक, वृद्ध, महिला शालेय मुले, यांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आलाय,या कारणामुळे आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आळंदी पोलिस आणि आळंदी नगरपरिषदेस दीले आहे,मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी कामाचे आदेश काढत कारवाई केली आहे, आळंदी पोलिस स्टेशन पी आय रमेश पाटिल,पोलिस गोपनीय अहवाल विभाग प्रमुख मच्छिंद्र शेंडे, यांनी जाग होत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी विरोधी पक्ष नेते डी डी भोसले पाटिल, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटिल, आळंदी शहर महीला माजी अध्यक्षा पुष्पा ताई कुऱ्हाडे पाटिल, आळंदी शहर उपाध्यक्ष बापू कुऱ्हाडे पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी माजी खजिनदार आरिफ शेख, अमित कुऱ्हाडे पाटिल, चेतन कानडे,प्रसन्न बोराटे, सुदर्शन शिंदे,ओम गंगोत्री, निखिल बनसोडे, संकेत पाटील सह नागरीक हजर होते

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे