सरपंच हा पांडूरंगा सारखा,आई सारखा व पक्का हरामी पाहीजे

*सरपंच हे सरपंचाचे ऐकण्यास येतात हे भाग्यच-भास्कर पेरे*
एका कुटूंबामध्ये बापाचे मुलगा ऐकत नाही.परंतु तीन हजार लोकसंख्येच्या गावात तीन हजार डोके संभाळाचे असल्याने सरपंच हा पांडूरंगा सारखा,आई सारखा व पक्का हरामी पाहीजे म्हणजे तीन हजार डोके संभाळता येते.अन या ठिकाणी बारा गावचे सरपंच उपस्थित आहे सरपंच सरपंचाचे ऐकण्यास येतात हे भाग्यच आहे असे प्रतिपादन गळनिंब ता.श्रीरामपूर येथील जनपर्व संघटनेच्या वतीने आयोजित दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्कर पेरे यांनी केले.
अध्यक्षस्थानी जिल्हा परीषेदेच्या माजी सदस्या आशाताई दिघे तर प्रमुख पाहूने जिल्हा परीषदेचे माजी सदस्य शरद नवले होते.
ते पुढे म्हणाले मला गावाने पंचवीस वर्ष सत्ता दिली अन गावालाही वाटलं की पक्का सालगडी भेटला म्हणून गावात पंचवीस वर्ष ग्रामपंचायतची मासिक मिटींग व ग्रामसभा देखील घेतली नाही.परंतु दर महीन्याच्या एक तारखेला सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,लाईनमन सर्व अधिकारी बरोबर घेवून गावात दोन तीन तास फेरी मारायचो व प्रोसिडींग ओढायचो गावाच्या समस्या सोडवता आल्या.सरकार शेतकरी मेल्यावर पैसे देतात परंतु आमच्या गावात पेरणी,नांगरणी या मेहनती ७०% खर्चात करून देतात
यावेळी काॅ.पांडूरंग शिंदे,मा.सभापती भाऊसाहेब हाळनोर,मा.उपसभापती आण्णासाहेब शिंदे,,माजी सरपंच हनुमान चिंधे,मा.सरपंच संभाजी नान्नोर सुनिल शिंदे,प्रा.डाॅ.एकनाथ ढोणे,कृषी सहाय्यक अभय थोरात,सागर पाटील,गंगापूर चे सरपंच सतिष खांडके,पिंपळगावचे सरपंच रामभाऊ वडितके,दवणगावचे सरपंच शितलताई भाऊसाहेब खपके,आंबीचे संगिता बाळासाहेब साळूंके,सरपंच ,अमळनेरचे सरपंच अरूणा भारत जाधव,गळनिंबचे सरपंच शिवाजी चिंधे,फत्याबादचे सरपंच शंकर वरखड,मांडवेचे सरपंच निखिल वडितके,कडीतचे सरपंच ज्ञानेश्वर वडितके यांच्यासह गळनिंब सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गवळी,जनपर्वचे पदाधिकारी संजय बाहूले,संजय शिंदे,विकास तुपे,मनोज तुपे,प्रभाकर जाटे,सखाराम बाचकर,सारंगधर शिंदे,संजय वडितके,इंद्रभान चिंधे,अशोक जाटे,ज्ञानदेव वडितके,पिराजी भडांगे,आदिनाथ जर्हाड,आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रवक्ते बापूसाहेब वडितके यांनी केले.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अध्यक्ष सोहम चिंधे यांनी मांडले.