नोकरीमहाराष्ट्र

निस्वार्थ व प्रामाणिक कार्याला निश्चितच फळ मिळते ह भ प दिलीप महाराज घोगे कॅप्टन एस.पी.सूर्यवंशी  सेवा- गौरव संपन्न*

*निस्वार्थ व प्रामाणिक कार्याला निश्चितच फळ मिळते ह भ प दिलीप महाराज घोगे कॅप्टन एस.पी.सूर्यवंशी  सेवा- गौरव संपन्न*

 

आयुष्यभर शिस्तीचे धडे देत शैक्षणिक सेवा करीत असलेल्या शंकर सूर्यवंशी यांनी केलेल्या निष्ठा प्रामाणिकपणा या वैशिष्टयांचा निश्चितच फायदा पुढील आयुष्यात होईल असा आशीर्वाद  कर्तव्यपूर्ती – सेवा गौरव सोहळ्यानिमित्त चिंतेश्वर संस्थांचे मठाधिपती    ह.भ.प.दिलीप घोगे महाराज यांनी व्यक्त केले.  गेवराई येथील जि. प .मा. शाळेचे (मुलांची ) सहशिक्षक तथा एन सी सी ऑफिसर  कॅप्टन शंकर पांडूरंग सूर्यवंशी ऊर्फ एस.पी. यांच्या 37 वर्ष शिक्षकी सेवेचा कर्तव्यपूर्ती सेवा गौरव कार्यक्रम नुकताच शाळच्या वतीने पार पडला . मंचावर ह.भ.प. दिलीप महाराज घोगे , प्राचार्य बी. एस.  येवले, गटशिक्षण अधिकारी गोपाळघरे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण काळम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार पोपळघट, गोदावरी मल्टिस्टेटचे प्रभाकर पराड,राष्ट्रीय नाभिक एकता  महासंघाचे अध्यक्ष भगवान अण्णा बिडवे, नाशिक मनपाचे माजी शिक्षण समिती प्रमुख  किरण बिडवे , सेनेचे तालुका प्रमुख शिनुभाऊ बेद्रे,जेष्ठ शिक्षक बी. एन. जोशी ,चाळक, प्राचार्य राजेंद्र घुंबार्डे, गुरुजी ,सौ प्रतिभा शंकर सूर्यवंशी आणि माता – पिता यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. सूर्यवंशी यांच्या वतीने पाहुणे व गुरुजनांना विठू – रुखमाईच्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या. सेवागौरव कार्यक्रमाची सुरुवात एस. पी. सूर्यवंशी यांच्या शहरातून भव्य सवाद्य मिरवणुकीने झाली. त्यानंतर शाळेत त्यांचे आगमन झाले ते फटाक्याच्या आतिषबाजीने. आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केल्या नंतर पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत गेवराई येथील संगीत विद्यालयाचे श्री तुळशीरामजी आतकरे यांच्या संगीत कलावंत ताफा  स्वागत गीत सादर करण्यात आले व उपस्थित यांचे मन जिंकून घेतले सहशिक्षक सावंत यांनी प्रास्ताविकात      गौरवमूर्तींचा जीवनपट उलघडून सांगितला. माजी विद्यार्थी – व्याख्याता रामानंद तपासे यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. मान्यवरांची गौरवपर भाषणे झाली. विविध शिक्षक व सामाजिक संघटनेच्या वतीने श्री व सौ .सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये गे. ता .शिक्षक सह पतसंस्था, परिवर्तन पॅनल, सेवानिवृत्त शिक्षक, योगा ग्रुप ,गुड मॉर्निंग ग्रुप, माजी विद्यार्थी, नाभिक महासंघ तसेच शाळेच्या शिक्षकवृंदांनी  शुभेच्छा देऊन सत्कार केला. कार्यक्रमास निमंत्रित गुरुवर्य एन.एस. मोटेसर गुरुवर्य दि.गो.मुंडेसर टी डी शिंदे सर अजगरे सर यांचे आशीर्वाद पर संदेश वाचन करण्यात आले.

 

कार्यक्रमास सुयोग शिक्षक कॉलनी सर्व शिक्षक शिक्षिका बंधू-भगिनी डी. यू. कांडेकर, मुख्याध्यापक महादेव घोळवे, कैलास जोगदंड, गणेश शहाणे ,माजेद काजी ,ब्रम्हनाथ येळम, बापू तारुकर, सावंत , खतीब, विष्णू जाधव, भारत ठोंबरे, कुडके, दयानंद पंडित, मस्के, कैलास पट्टे , राठोड, जाधव ,दहिफळे,बी. बी. गायकवाड,सुळे नामदेव शिंदे, अर्जून बारगजे ,प्रविण पंडित, कांतीलाल लाड, अॅड. राम देशपांडे ,एस. डी. जरांगे, प्रकाश भुते, प्रा राजेंद्र बरकसे ,प्रभाकर घोडके, दिलीप जोशी ,अरुण वायचळ, दिनकर शिंदे, एकनाथ लाड ,दयानंद कांडेकर, सुभाष शिंदे, तात्यासाहेब  मेघारे, विष्णू खेत्रे ,पो. अधिकारी  सतीश खरात, सुनिल पोपळे, ज्ञानेश्वर चातूर ,नाना पंडित, खंडागळे सर, त्यांचे इतर सहकारी वैजिनाथ फुलझळके, नगर येथील  टेमकर सर फौजी बालाजी सुरवसे, अरुण परदेशी सूर्यवंशी सर यांचे जावई औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाचे डॉक्टर सचिन तुळशीरामजी वाघमारे साहेब, त्यांचे मेव्हणे सुधीर सूर्यवंशी भारतराव ठोंबरे डॉ. शंतनू शंकर सूर्यवंशी, डॉ शुभांगी सचिन वाघमारे (सूर्यवंशी) डॉक्टर शिवराज पांडुरंग सूर्यवंशी डॉक्टर कल्याणी शिवराज सूर्यवंशी ांच्यासह मित्र परिवार ,आप्तेष्ठ, सरांचे युवाई हिंगोली जिल्हा परिषद  उप -लेखा अधिकारी श्री. तुळशीरामजी वाघमारे नातेवाईक ,बीड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने प्शिक्षक मित्र , शिक्षिका, पत्रकार ,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या  सेवा गौरव कर्तव्य पूर्ती सोहळा या सोहळ्याकडे विशेष लक्ष जाते ते गुरुजनांच्या उपस्थित शिष्यांचा सेवा गौरव पूर्ती सोहळा संपन्न.

 

या भव्य दिव्य सेवा गौरवपूर्ती सोहळ्याचे संचलन शाळेचे शिक्षक श्री शिवाजीराव झेंडेकर सर यांनी तर आभार श्री सावंत सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी कर्मचारी वृंद इत्यादी परिश्रम घेतले कार्यक्रम तब्बल तीन ते चार तास सुरू होता या भव्य कार्यक्रमाचे आभाराने सांगता झाली.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे