राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती ज्ञानमाऊली शाळेत साजरी…*

*राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती ज्ञानमाऊली शाळेत साजरी…*
संपूर्ण जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णूतेची शिकवण देणारे महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ज्ञानमाऊली इंग्लिश स्कूल घोडेगाव मध्ये दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी गांधी व शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी अंजनी नजन मॅडम, शाळेचे मॅनेजर फा. सतिश कदम व शाळेचे प्राचार्य फा. डॉमनिक यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात होती. सुरुवातीला फोटोंना पुष्पहार घालण्यात आला. नंतर आरिज शेख, कृष्णा लोखंडे, ज्ञानेश्वरी ढेरे व ओम होंडे या मुलांची भाषणे झाली.
मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रोजेक्ट अंतर्गत स्वच्छता मॉनिटर सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.
आपली शाळा, आपला परिसर, कायमस्वरूपी स्वच्छ असावा व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थांचे विचार, मन, शारीरिक व्यायाम वाढविण्यासाठी शाळेत स्वच्छतेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी या स्वच्छतेत सहभाग दर्शविला. फादर डॉमनिक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली चव्हाण व साक्षी आडसुरे यांनी केले तर आभार रंजना साळवे मॅडम यांनी मानले. कार्यक्रम घडवून आणण्यासाठी शाळेची सांस्कृतिक कमिटी, हेड गर्ल व हेड बॉय यांनी फार परिश्रम घेतले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.