लोकशाही मार्गाच्या शांततेने होणाऱ्या आळंदी बंदला विश्वस्तांच्या वक्तव्याचे ग्रहण*
*लोकशाही मार्गाच्या शांततेने होणाऱ्या आळंदी बंदला विश्वस्तांच्या वक्तव्याचे ग्रहण*
आळंदी/स्थानिक ग्रामस्थ हा विश्वस्त असावा ही मागणी डावलल्याने प्रकरण आणि वेळोवेळी सूचित करू नये संधी देत नाही या कारणास्तव दिनांक पाच डिसेंबर 2023 रोजी आळंदी बंद ची हाक पुकारण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थ विश्वस्त पदी असावा ही मागणी डावल्याने गावकऱ्यांनी एकत्र येत शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घेतली प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचा बंद चे हत्यार उपसले. त्यासाठी रीतसर परवानगी घेतली आणि आमची मागणी योग्य आणि रास्त आहे हे शासनाला पटवून देण्यासाठी बंदमध्ये सर्व ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांनी सहभागी नोंदवला मात्र प्रमुख विश्वस्त असलेले योगेश देसाई यांनी पुण्यातून एक निवेदन प्रसिद्ध करत आळंदीकरांना विश्वस्त पदासाठी येण्याच्या बाबत आक्षेपार्य असे विधान केले. आणि आळंदीकर नेमकं काय योगदान देतात. हा प्रश्न उपस्थित केला त्यामुळे आळंदीकर ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आणि ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले सनचशीर मार्गाने लोकशाही मार्गाने बंद पुकारताना केवळ विश्वस्त पदावर ग्रामस्थांचा प्रतिनिधी असावा ही मागणी रास्त आहे याबाबत विश्वस्त यांना राग आल्याची कृती त्यांच्याकडून होत आहे असे त्यांच्या विधानावरून भारतात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे यासाठी आळंदी पोलीस स्टेशन येथे या बंदमुळे वारकरी भाविकांना त्रास होईल त्यामुळे बंदची भूमिका मागे घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे अशी आशा व्यक्त केली मात्र जमलेल्या ग्रामस्थांनी आळंदी पोलीस स्टेशन येथे देसाई यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत यामुळे आम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास देसाई भाग पाडत आहेत असे मत मांडले तसेच देसाई यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी माघावी. ही भूमिका घेत बंद मात्र शंभर टक्के करणारे असा पवित्र घेतला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी त्याबाबत ग्रामस्थांची समजूत काढण्यातही प्रयत्न केला परंतु ग्रामस्थ देसाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कुठलीही भूमिका मान्य करण्यात तयार नसल्याचे दिसून आले दरम्यान दिनांक पाच डिसेंबर 2023 रोजी सकाळी चाकण चौक येथून निषेध मोर्चा निघणार आहे आणि महादेव चौकात त्याची सांगता समारोप सभेने होणार आहे यामध्ये आळंदीकरांनी दिलेले योगदान देसाई यांच्या वक्तव्याचा निषेध आणि विश्वस्त मंडळावर ग्रामस्थ विश्वस्त म्हणून डावल्याची प्रचंड नाराजी व्यक्त केली जाईल. मुळात बंद बाबत शांततेने प्रक्रिया राबवल्या जात होत्या रीतसर परवानगी घेतल्या गेल्या होत्या मात्र विश्वस्त देसाई यांनी केलेले वक्तव्य देश भावनेने केल्याचे दिसून येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे आणि त्यामुळे लोकशाही मार्गाने होणाऱ्या या बंदला विश्वस्तांच्या वक्तव्याने ग्रहण लागले आहे. ग्रामस्थांच्या या बैठकीसाठी बबनराव कुऱ्हाडे डीडी भोसले सचिन गिलबिले प्रकाश कुऱ्हाडे शंकरराव कुऱ्हाडे नंदकुमार कुऱ्हाडे संजय घुंडरे आनंदराव मुंगसे रमेश गोगावले साहेबराव कुऱ्हाडे अशोक कांबळे रामदास भोसले. विलास कुऱ्हाडे संकेत वाघमारे. सर्व पत्रकार बांधव नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान उद्या सकाळी ठीक साडेनऊ वाजता चाकण चौक येथून निषेध मोर्चाला सुरुवात होऊन त्याची सांगता माऊलींच्या महाद्वार मंदिरात होणार असल्याचे आणि आळंदी बंद हा होणारच यावर गावकरी ठाम असल्याचे कळते.