गुन्हेगारीब्रेकिंग

सरकारी कामात अडथळा; श्रीरामपूर तालुक्यातील कारेगावच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा; कारेगावच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल

 

टाकळीभान (प्रतिनिधी)- सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.प्रणव अशोक भारत व सुनिल गंगाधर पटारे असे गुन्हा दाखल झालेल्या सदस्यांची नावे आहेत. 

            याप्रकरणी ग्रामसेवक राजू भालदंड यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीत म्हंटले आहे की, मी ग्रामविकास अधिकारी म्हणून कारेगाव ग्रामपंचायत येथे सुमारे ९ वर्षापासून कामकाज करत आहे. शुक्रवार दि. २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत येथे नियमित मासिक सभा होती. सभा सकाळी ११ वाजता सुरू झाली. यावेळी सरपंच आनंद वाघ, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर उंडे, प्रणव भारत, सुनील पटारे, क्लर्क सुनील बागुल, कम्प्युटर ऑपरेटर किशोर गोरे उपस्थित होते. मी मिटींग मधील कामकाजाचे वाचन करत असताना ग्रामपंचायत सदस्य प्रणव भारत व सुनील पटारे यांनी मला तुम्ही सरपंचाची सही न घेता कामाच्या निविदा परस्पर पेपरला का दिल्या. त्यावर मी त्यांना म्हणालो की, मी सरपंचाच्या सह्या घेऊनच निविदा पेपरला प्रसिद्धीला दिलेल्या आहे. त्यावर ते मला म्हणाले की, तू खोटे बोलतो असे म्हणत त्यांनी मला शिवीगाळ केली. त्यावेळी सरपंच आनंद वाघ यांनी त्यांना समजावून सांगितले. तरीही त्यांनी काही न ऐकता मला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन कार्यालयात कोंडून बाहेरून दरवाजाला कुलूप लावले. त्यानंतर मी टाकळीभान येथील ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव यांना फोन करून सदर घटनेबाबत कळविले असता ते कारेगाव येथे आले व त्यांनी दरवाजा उघडून मला बाहेर काढले, असे फिर्यादीत म्हटले आहे

4.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे