बेलापुरकरासारखा समाजोपयोगी उपक्रम सर्वत्र राबवीला जावा -पोलीस अधिक्षक मनोज पाटील

बेलापुरकरासारखा समाजोपयोगी उपक्रम सर्वत्र राबवीला जावा -पोलीस अधिक्षक मनोज पाटील
सण ,उत्सव ,जयंत्या मोठ्या उत्सहात साजऱ्या करा .त्याचा आनंद लुटा. पण हे करत असताना बेलापुरकरासारखा समाजात आदर्श निर्माण होईल असा कार्यक्रम ,उपक्रम राबवा असे अवाहन पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले . भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, बेलापुर ग्रामपंचायतीचा शतक महोत्सव याचे औचित्य साधुन बेलापुरकरांनी गणेशोत्सव काळात गावात शांतता राखुन विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्ज पार पाडले गणोशोत्सव काळात जिवंत देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विना पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडल्यास रु.११,००० बक्षीस देईल असे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत जाहीर केले होते तसेच श्री. गवळी साहेबांनी ११००० रुपये दिल्या नंतर मी ही ११००० रुपये बक्षीस देईल असे तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनी जाहीर केले होते. काल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या समक्ष पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी रु.११००० बक्षीस रक्कम सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या कडे सुपूर्द केली. त्या नंतर लगेच एकनाथ नागले यांनी देखील रु.११००० सरपंच, उपसरपंच यांच्या कडे जमा केली.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण तसेच गणेश मंडळांना सन्मानपत्र असा कार्यक्रम बेलापुर येथील जुने बालाजी मंदीर येथे आयोजित करण्यात आला होता .त्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.जि प ,सदस्य शरद नवले हे होते.सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, रणजित श्रीगोड, कनजी टाक, एकनाथ उर्फ लहानु नागले ,गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,सुधाकर खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,रामेश्वर सोमाणी, ,कनजीशेठ टाक,बाळासाहेब दाणी,विष्णुपंत डावरे,रवींद्र कोळपकर,पोलीस पाटील अशोक प्रधान,अन्वर सय्यद,प्रभात कुऱ्हे,शफीक बागवान,जाकीर हसन शेख आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पोलीस अधिक्षक मनोज पाटील पुढे म्हणाले की माझ्या २५ वर्षाच्या नोकरीत पोलीस बंदोबस्त नको असे म्हणणारे बेलापूर हे पहीले गाव पाहीले आहे .आनंद लुटतानाही मनात काहीतरी भिती असते .त्यामुळे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जाते .बेलापुरगावाने विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचा दिलेला शब्द खरा करुन दाखविला. बेलापूर च्या नेतृत्वाचे हे यश आहे. बेलापुरकरांनी राबविलेला हा “बेलापुर पँटर्न” जिल्ह्यात नव्हे तर राज्यात लागु व्हावा.सण उत्सव ज्या उद्देशाने सुरु झाले तो उद्देश बाजुलाच राहीला. त्याचे कारण आपण विसरत चाललो आहोत त्यामुळे पोलीसावरील कामाचा ताण वाढत आहे .सर्वच जण पोलीस बंदोबस्त मागतात .सण उत्सव साजरा करणारे रात्री अकरा बारा नंतर झोपी जातात .पण पोलीस मात्र पहारा देत असतो सण उत्सवात काही विघ्न येवु नये म्हणून दारुबंदी करावी लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या गावाचे अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो असुन इतरांनी देखील या गावाचा आदर्श घ्यावा असे अवाहनही श्री.पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात शरद नवले म्हणाले की सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लीम बांधव विविध संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार बंधु ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असुन गावाच्या विकासासाठी उज्वल भविष्यासाठी अशीच भूमिका ठेवावी असे अवाहनही नवले यांनी केले या वेळी अहमदनगर गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल कटके ,सरपंच महेंद्र साळवी प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे ,हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले .या वेळी देखावा स्पर्धेत प्रथम क्रमांक हिंदु संघटक विर सावरकर मित्र मंडळ रुपये पाच हजार द्वितीय क्रमांक छत्रपती तरुण मंडळ रुपये तिन हजार तृतीय क्रमांक गौरी गणेश बाल मित्र मंडळ रुपये दोन हजार सिध्दी विनायक युवा मंच रुपये एक हजार रामराज्य मित्र मंडळ रुपये एक हजार तसेच सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला तसेच गणेश विसर्जन शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व गणेश मंडळ पोलीस पाटील जामा मस्जिद ट्रस्ट महावितरणचे अधिकारी कर्मचारी गणेश विसर्जन काळात मदत करणारे सफाई कर्मचारी पोहणारे बेलापुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आदिंचा सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला या वेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले.यावेळी गावकरी पतसंस्थेचे संचालक विशाल आंबेकर, सचिन वाघ, महेश कुऱ्हे,अमोल गाडे,दादासाहेब कुताळ,नितीन शर्मा,भैय्या शेख, दिलीप दायमा, किशोर कदम,हैदरभाई सय्यद,गोपी दाणी,राम कुऱ्हे,राहुल माळवदे,जयेश अमोलिक, शहानवाज सय्यद,दस्तगीर शेख, सोमनाथ साळुंके, बाबुलाल पठाण,राकेश कुंभकर्ण, गोपाल जोशी,रोहित शिंदे आदी उपस्थित होते.