सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून कर्जत पोलिसांचे कौतुक

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून कर्जत पोलिसांचे कौतुक
_अट्टल गुन्हेगारांना पकडण्यासाठी केलेल्या मदतीचे सातारा एसपीं नी पत्राद्वारे केले कौतुक_
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गुंतागुंतीच्या किचकट गुन्ह्यांचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीमने तपास लावले आहेत. विशेष म्हणजे कमी कालावधीत हे तपास लावल्याने अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अनेकवेळा ‘बेस्ट डिटेक्शन’ असा बहुमान प्रदान करत प्रशस्ती पत्रक देऊन गौरवीले आहे.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनीही अधिकृत पत्राद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे पोलीस जवान श्याम जाधव गोवर्धन कदम संकेत बोरुडे यांचे स्तुतीसुमनांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील वडूज, औंध, उंब्रज या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सलग दरोडे होत होते. त्या दरोड्यांसह जबरी चोरीच्या गुन्ह्यांमधील अविनाश उर्फ काल सुभाष भोसले, अजय सुभाष भोसले, सचिन सुभाष भोसले (सर्व रा.माहिजळगाव ता.कर्जत), राहुल उर्फ भाल्या पदु भोसले (रा.वाळुंज पोस्ट-बाबुर्डी ता.जि.अहमदनगर), मेघराज उद्धव काळे (रा.वाकी ता.आष्टी जि.बीड) या आरोपींना पकडण्यासाठी सातारा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना अत्यंत मोलाची मदत केली आहे. स्वतः वैयक्तिक लक्ष घालून,प्रसंगावधान दाखवून जलद व तातडीने कार्यवाही केल्यामुळे दरोड्यांसारख्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात यश आले आहे.तसेच या आरोपींकडून गुन्हा घडण्यास प्रतिबंध झाला आहे.तसेच आणखी काही गुन्हे उघडकीस येण्यास मदत झाली आहे.सातारा जिल्हा पोलीस दलास केलेले सहकार्य प्रशंसनीय असल्याचे या पत्रात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नमूद केले आहे. सदरचे प्रशंसापत्र उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते कर्जतचे पोलिस अधिकारी आणि जवान यांना देण्यात आले.