आळंदीत डोळे येण्याची साथ भयंकर वेगाने प्रसार ..तीन दिवसात 1600 जन बाधित.. असल्याची माहिती आली समोर
आळंदीत डोळे येण्याची साथ भयंकर वेगाने प्रसार ..तीन दिवसात 1600 जन बाधित.. असल्याची माहिती आली समोर
आळंदी देवाची येथे लहान मुलांना डोळे येणे या रोगाने डोके वर काढले आहे. कंजक्टिव्हिटी म्हणजे डोळे येणे या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आळंदी झाल्याची दिसून येत आहे विविध वारकरी शिक्षण संस्था मधून लहान मुलांना या रोगाची लागण झालेली आहे .
डोळ्याची जळजळ होणे डोळे येणे पाणी येणे पापण्या चिकटणे डोळ्याची आग होणे प्रखर प्रकाशाकडे पाहताना डोळ्यांना त्रास होणे असे विविध रोगांनी लहान मुले त्रस्त झालेली आहेत तसेच सुमारे तीन दिवसांमध्ये सोळाशे मुलांना या रोगाने प्रभावित केलेले आहे अशी माहिती ग्रामीण आरोग्य विभागाच्या डॉक्टर उर्मिला शिंदे यांनी दिली आहे.
तीन दिवसात सोळाशे मुलांना लागण झाले तर प्रसार भयंकर असून भविष्यामध्ये डोळे येणे हा रोग आटोक्यात आणण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे सूचना ग्रामीण रुग्णालय आळंदी यांच्यामार्फत करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी ग्रामीण रुग्णालय आळंदी उर्मिला शिंदे यांनी केलेली आहे डोळ्यांना हात लावल्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवावेत डोळ्यांना सारखा स्पर्श करू नये आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल चा वापर करावा असेही सूचना ग्रामीण आरोग्य रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलेले आहेत