पाणी वापर संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार मांजरी येथे संपन्न
पाणी वापर संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार मांजरी येथे संपन्न
चंद्रगिरी दूध उद्योग समूहाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जतन करून नुकत्याच पार पडलेल्या पाणी वाटप सोसायटीच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचा दूध समूहाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जुंधारे यांनी सर्व संचालकांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सर्व संचालकांनी त्यांच्यावर पडलेली जबाबदारी ही शेतकऱ्यांच्या निगडित जीवनमरणाचा प्रश्न असून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी पाणी वाटप सोसायटीमध्ये राजकारणाची भूमिका बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी वाटप करून परिसर सुजलाम सुफलाम होईल व शेतकऱ्याच्या पदरात या शेतीच्या माध्यमातून दोन पैसे पण मिळेल अशी बांधिलकी जपावी असे आवाहन जुंधारे यांनी केले.
तसेच संचालकांनी ही आपल्या मनोगतामध्ये दिलेली जबाबदारी नक्की चांगली पार पाडू शेतकऱ्यांनीही चाऱ्या दुरुस्तीच्या वेळी सोसायटीला सहकार्य करावे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाटपाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करु असे उपस्थित शेतकर्यांना आश्वासित केले नवनिर्वाचित संचालकांमध्ये विजय जाधव, सतीश जाधव, बापूसाहेब जाधव, सुभाष शिंदे ,कांतीलाल जाधव ,अशोक विटनोर,जानकु बाचकर, भाऊसाहेब जगन्नाथ विटनोर, आदिनाथ चोपडे ,गणेश विटनोर, आदेश जुंधारे, दत्तात्रय विटनोर ,धनंजय म्हाळू विटनोर आदी संचालकाचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवबाबा विटनोर होते तर कार्यक्रमाला उपस्थित मांजरी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब विटनोर, शेणवडगाव सोसायटी सदस्य मोहनराव जाधव,चांगदेव टेकाळे ,संजय जाधव गंगाधर देशमुख तर उपस्थित दूध उत्पादक बाळासाहेब विटनोर,विठ्ठल विटनोर,संपत होडगर ,नानासाहेब विटनोर,किशोर बाचकर, मेजर विक्रम विटनोर, लक्ष्मण विटनोर ,सर्जेराव विटनोर ,रावसाहेब विटनोर, ज्ञानदेव जुंधारे,भास्कर विटनोर, भगवान सर विटनोर,संदेश जुंधारे, श्रीकांत जुंधारे, मनोज विटनोर,राऊसाहेब विटनोर,गौरव जुंधारे,अमोल विटनोर,गणेश विटनोर आदी उपस्थित होते सूत्रसंचालन विलासदादा सैंदोरे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार विजय विटनोर यांनी मानले