विना पोलीस बंदोबस्त मिरवणूक गावाने जिंकले बावीस हजार रुपयांचे बक्षिस
विना पोलीस बंदोबस्त मिरवणूक गावाने जिंकले बावीस हजार रुपयांचे बक्षिस
शांतता कमीटीच्या बैठकीत दिलेल्या अश्वासनाची पूर्तता करत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनी प्रत्येकी अकरा हजार रुपये प्रमाणे बावीस हजार रुपये बेलापुर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याकडे जमा केले . गणेशोत्सवापूर्वी बेलापुर पोलीस स्टेशन येथे शांतता कमीटीची बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत गाव संरक्षणात गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला होता .त्यावर बोलताना पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले होते की अशी मागणी मी पहील्यांदाच पहात आहे त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्यास मी गावाला अकरा हजार रुपये बक्षीस देईल त्या वेळी प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ उर्फ लहानु नागले यांनी देखील बक्षिस देण्याचे मान्य केले गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत विना पोलीस बंदोबस्त घेता पार पडली पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते गणेश मंडळाचा सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला त्या वेळी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे यांनी अकरा हजार रुपये रोख,मा. जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्याकडे सूपूर्त केले त्यानंतर प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनीही सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अकरा हजार रुपये सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे यांच्याकडे सुपुर्त केले या वेळी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे बाळासाहेब दाणी पत्रकार देविदास देसाई रणजित श्रीगोड पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे दिलीप दायमा किशोर कदम विष्णूपंत डावरे प्रफुल्ल डावरे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे मुस्ताक शेख आदि उपस्थित होते