वेळेवर धान्य उपलब्ध करुन द्या- स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे मागणी
वेळेवर धान्य उपलब्ध करुन द्या- स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे मागणी
बेलापुर (प्रतिनिधी )-मागील धान्य वाटपासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविलेला असुन ती मंजुरी मिळताच मागील धान्य वाटपास परवानगी देण्यात येईल तसेच दुकानदारांच्या इतर अडचणीही सोडविण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले . मोफत धान्य वाटपाचे कमिशन त्वरीत अदा करा पाँज मशिनवरील अडचणी दुर करा दुकानदारांना वेळेवर धान्य उपलब्ध करुन द्या आदि मागण्याचे निवेदन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांना दिले जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी बाबत अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की माहे मे २०२१ पासून धान्य दुकानदार मोफत धान्य वितरण करत आहे एक वर्ष झाले तरी मोफत धान्य वाटपाचे कमिशन दुकानदारांना देण्यात आलेले नाही ते त्वरीत अदा करावे धान्य वाटप करताना दुकानदारांना वेळेवर धान्य उपलब्ध होत नाही धान्य मिळाले तर ते मशिनवर अपलोड केलेले नसल्यामुळे धान्य असुनही त्याचे वाटप करता येत नाही त्यामुळे दुकानात धान्य येताच ते त्याच दिवशी मशिनवर अपलोड करावे दुकानदारांना महीन्याचे व मोफतचे धान्य वेळेवर उपलब्ध करुन द्यावे महीना अखेरीस माल मिळतो वाटप सुरु करताच मशिन बंद होते व तो माल दुसऱ्या महीन्यात दिसत नाही त्यामुळे धान्य असुनही वाटप करता येत नाही उशिरा धान्य मिळालेल्या दुकानदारांना धान्य वाटप करण्यास मुदतवाढ मिळावी जिल्ह्यातील सर्व गोदामात वेळेवर धान्य उपलब्ध करुन द्यावे आदि मागण्यांचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती जयश्री माळी यांना देण्यात आले या वेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजित वांढेकर राऊत बाहुले जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण चंद्रकांत झुरंगे बजरंग दरंदले विश्वासराव जाधव बाळासाहेब दिघे सुरेशराव उभेदळ मुनिर देशमुख बाबा कराड सुखदेव खताळ संजय दारुणकर किशोर पोटे राजेंद्र थोरात आत्माराम कुंडकर नितीन गोरे ईकबाल शेख आदिसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते