मागेल त्या शेतकऱ्यांस पीक कर्ज द्या शेतकरी संघटनेचे अनिल औताडे यांचा तिव्र आंदोलनाचा इशारा

मागेल त्या शेतकऱ्यांस पीक कर्ज द्या
शेतकरी संघटनेचे अनिल औताडे यांचा तिव्र आंदोलनाचा इशारा
जिल्हा बँकेने बॅंकेने कार्यक्षेत्राबाहेर जाऊन संचालकांच्या नातेवाईकांच्या पत नसलेल्या साखर कारखान्यांना बेकायदेशीरपणे कर्जवाटप सुरू केले आहे. मात्र ज्यांचा मूळ अधिकार आहे त्या शेतकऱ्यांना गेल्या सात ते आठ वर्षापासून पीक कर्ज वाटपाच्या धोरणात वेळोवेळी मनमानी पद्धतीने परिपत्रके काढून बदल केल्याने जिल्ह्यातील पीक कर्जापासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत संचालक मंडळाने ३० जुलैपर्यंत निर्णय घेऊन मागेल त्या शेतकऱ्यास सरसकट पद्धतीने कर्जवाटप करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिलह्यातील शेतकरी सहकारी सोसायटीमध्ये पीक कर्जाबाबत आग्रह हक्क असूनही बँकेकडून असमर्थता दाखवली जात आहे वास्तविक राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतलेल्या 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांना मागील दोन्हीही कर्जमाफी योजनेचा अटी शर्ती मुळे लाभ झालेला नाही शासनाने कर्जमाफी योजनेत क्षेत्राची रकमेची व तारखेची अट न ठेवता कर्जमाफी योजना राबवणे गरजेचे होते परंतु या मध्ये चारही पक्षाच्या युती आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे व त्यामुळे 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे बंद झाले आहे जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून ती आज शेतकऱ्यांना पीक कर्ज न देता सहकारी साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर शेकडो कोटीचे भरमसाठ कर्ज देत आहे जिल्ह्यातील बहुतांश सहकारी साखर कारखाने कोट्यवधी रुपये तोट्यात असून सदर कारखान्याची पत नसतानाही बेकायदेशीर कर्ज वाटप होत आहे जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र हे जिल्हा असून बँकेच्या संचालक मंडळाने नात्यागोत्यांच्या हित संमंधातून जिल्ह्याबाहेर अशोक डवनगावकर यांच्या गदाना ता.खुलताबाद या कारखान्यात 10 वर्षांपूर्वी बेकायदेशीर कर्ज दिले सदर कर्जाची अद्यापही वसुली झाली नाही जिल्हा बँकेचा उद्देश हा शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचा असून मात्र बँक सदर उद्देशाचे पालन करताना दिसत नाही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वितरण करण्यासाठी राज्यसहकारी बँक आहे परंतु बहुतांश कारखाने हे तोट्यात असल्यामुळे त्या कारखान्यांना राज्य सहकारी बँक कर्ज देणे बाबत टाळत असल्याचे दिसून येते जिल्ह्यात यावर्षीच्या गळप हंगामामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण केला त्यामुळे बऱ्याच कारखान्याचा हार्वेस्टिंग प्रोग्राम चुकल्यामुळे मार्च एप्रिल मे व जून या महिन्यात तुटलेल्या उसाच्या वजनात 50 टक्के घट झाली आहे अशा परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांच्या ऊस गळापा अभावी शिल्लक राहिला याबाबतची जबाबदारी कारखाना बँक आमदार खासदार व तसेच शासनासह कोणीही घेतली नाही या सर्व पदावर त्या त्या तालुक्यातील एक किंवा दोन व्यक्ती केंद्रित असल्यामुळे न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे अशा अशोक कारखान्यासह बहुतांश साखर कारखान्याकडून ऊस लागवडी बाबतचे खोटे दाखले आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना दिले असल्याचे आढळून आले श्रीरामपूर तालुक्याला बँकेचे दोन संचालक असूनही पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात तरी याबाबत बँकेने ऊस पिकासाठी पीक कर्ज देणे बाबत कारखाना दाखले न घेता स्वघोषणापत्र घेऊन इतर पिकाप्रमाणे पीक कर्ज वाटप चालू करावे राष्ट्रीय युक्त बँका पतसंस्था थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटपाचे आदेश द्यावेत व जिल्ह्यातील मागेलं त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यावे याबाबत 30 जुलै अखेरपर्यंत बँकेच्या विशवस्थ मंडळाने निर्णय घ्यावा अन्यथा अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटना हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थित जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयास ताळे ठोकण्यात येईल असा इशारा पत्रकात देण्यात आला आहे.
पत्रकावर अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, इंद्रभान चोरमल, गोरक्षनाथ पवार, साहेबराव चोरमल, मचिछ्द्र आव्हाड, अकबर शेख आदींची नावे आहेत.