मंत्री झालेल्या आपल्या भावाचे बहिणीने केले औक्षण धनंजय मुंडे यांचे बहीण पंकजा मुंढे कडून कौटुंबिक स्वागत
मंत्री झालेल्या आपल्या भावाचे बहिणीने केले औक्षण
धनंजय मुंडे यांचे बहीण पंकजा मुंढे कडून कौटुंबिक स्वागत
गेल्या अनेक वर्षात राजकारणात एकमेकांचे विरोधक म्हणून काम केलेल्या मुंडे बहीण भावात गेल्या काही महिन्यांपासून दुरावा कमी झाला व हळूहळू त्यांच्यातील राजकीय दुरावा कमी होत गेला आहे. बहीण भावाचे हे नाते आबाधित असल्याचे वेळोवेळी दोघांनीही स्पष्ट केलेलेच आहे. मात्र आता या नात्यात दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल अशी स्थिती आली आहे. अजित दादा यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या अनुषंगानेच भाजपा राष्ट्रीय सचिव असलेल्या धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी मंत्री झालेल्या आपल्या या भावाचे अतिशय आत्मेतेने कौटुंबिक स्वागत केले असून आज पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे औक्षण करत व पेढा भरवत अभिनंदन केले. त्याचप्रमाणे पंकजाताई भाजपाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून काम करतात या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याबाबतचे फोटो धनंजय मुंडे यांनी ट्विट केले असून बहिण भावाचे हे म्हटले आहे.
राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे.