ब्रेकिंगमहाराष्ट्र

एसटी महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग आता महिलांचा हाती

एसटी महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग आता महिलांचा हाती

 

महाराष्ट्रात एसटी सेवेला सुरुवात होऊन नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर बस चालविली आहे. या अगोदर महिला वाहक म्हणून कार्यरत होत्या. पण आता त्या चालक होऊन महामंडळाच्या बसचे सारथ्य करणार आहेत.

 

अर्चना अत्राम असे पहिली एसटी बस चालकाचे नाव आहे. अत्राम यांनी बस चालविल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. एसटीच्या पुणे विभागात नुकत्याच ६ महिलांची चालक पदावर नियुक्ती झाली आहे. यातीलच सासवड आगारात दोन दिवसांपुर्वी नियुक्त झालेल्या आणि नियुक्तीनंतर पहिली महिला चालक म्हणून प्रवासी वाहतूक फेरी पुर्ण करण्याचा मान आत्राम यांना मिळाला आहे. अर्चना अत्राम असे पहिल्या महिला एसटी बस चालकाचे नाव आहे. गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजता अत्राम या सासवड डेपोतून निरासाठी बस घेऊन गेल्या. यावेळी बसमध्ये १७ प्रवासी होते. अत्राम यांनी बस चालवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी अक्षरश: कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर केला आहे. दरम्यान एसटी महामंडळाने दीड ते दोन वर्षांपूर्वी महिला चालकांची भरती केली होती. त्यावेळी ३० ते ४० महिला चालकांची भरती करण्याचे नियोजन होते. त्यापैकी १७ महिला चालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, त्या लवकरच पुणे विभागात रुजू होणार आहेत.

 

नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची…

आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा.अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला… 

 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्टिवट करून अत्राम यांचे अभिनंदन केले आहे. ‘नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची… आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा.अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा.अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन.’ असे चाकणकर म्हणाल्या आहेत.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे