मानोरीत श्री संत सद्गुरु बाळूमामा पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत

मानोरीत श्री संत सद्गुरु बाळूमामा पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत
दररोज 2000 पेक्षा जास्त भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी येथे श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या पालखीचे आगमन झाले मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या भक्तीमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले संपूर्ण गावातून ही मिरवणूक काढण्यात आली पालखीचा मार्ग रेणुका माता मंदिर मानोरी ते गणपतवाडी हनुमान मंदिर असा होता मानोरी गणपत वाडी परिसरात ही बाळुमामाची पालखी तसेच बाळूमामाच्या 2000 मेंढरांचा गेल्या सात दिवसापासून वास्तव्य आहे तसेच सात दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेले आहे गणपत वाडी येथे आकर्षकाशी विद्युत रोष नाही करण्यात आली पंचक्रोशीतील महिला पुरुष लहान मुलांसह तरुण भाविक वर्गाची मोठी गर्दी बघायला मिळते तालुक्यातील अनेक गावातून सायंकाळी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळते दररोज सायंकाळी आठ वाजता श्री संत सद्गुरू बाळुमामा ची आरती होते त्यानंतर दररोज आमटी भाकरीचा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो सुमारे 2000 होऊन जास्त भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात मानोरी गणपतवाडी परिसरातील महिला आपापल्या घरून येताना भाकरी चपाती घेऊन येतात व मनोभावे पालखीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात तसेच राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार माननीय प्राजक्त दादा तनपुरे यांनी देखील भेट देऊन पालखीचे दर्शन घेतले तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी आमदार शिवाजी कर्डिले साहेब यांनी देखील भेट घेऊन मनोभावे पालखीचे दर्शन घेतले श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या पालखीने मानोरी व गणपत वाडी पंचक्रोशी त गेल्या सात दिवसापासून भक्तीमय वातावरण तयार झालेले आहे
तसेच या कार्यक्रमाची सांगता आज दिनांक 10 6 2023 रोजी सायंकाळी ह भ प कांडेकर महाराज उंबरगावकर यांच्या कीर्तनाने सांगता होणार आहे त्यानंतर श्री संत सद्गुरु बाळूमामा यांची आरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान गणपती व मानोरी ग्रामस्थांनी केलेले आहे