स्वाभिमानी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या धरणात उड्या ; खेवरे व मोरेसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात !
राहुरीच्या मुळा धरणात भुमि पुत्रांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न फोल!
स्वाभिमानी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या धरणात उड्या ; खेवरे व मोरेसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात !
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान झालेल्या पिकाला एकरी चाळीस हजार रुपये अनुदान व भरपाई मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी सरकारला आठवडेभराचा अल्टिमेट दिला होता. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची रक्कम जमा न झाल्याने या निषेधार्थ राहुरीच्या मुळा धरणात आज दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता खेवरे,मोरे व कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टाळला.
पोलीस प्रशासनाने तात्काळ जलसमाधी घेणाऱ्या खेवरे/ मोरे यासह शेतकरी संघटना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह १३ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून यांच्या वर दुपार पर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते.
शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज राहुरीच्या मुळा धरणात उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन करणार केले.
हेक्टरी ४० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करा शासनाला ७ दिवसाचा अल्टिमेट दिला होता मात्र अद्याप कोणती नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे व शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वात आज मुळा धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी अजित पाटील, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा, नीरज बोकील, चारुदत्त खोंडे, महादेव शिंदे आदिंसह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, युवा सेनेचे गणेश खेवरे, पोपट सिरसाठ, कैलास शेळके. बाबासाहेब मुसमाडे, सचिन म्हसे, भैया खेवरे, दिगंबर कोहकडे, अमोल पवार, पप्पु तमनर, अनिल चव्हाण ,सुरज पोटे,महेश बोरुडे, नंदु हरिश्चंदे, भरत धोत्रे,अशोक खेवरे, सतिश माने सुनिल वाळुंज ,संदिप येवले, दत्तात्रय गागरे ,सुनिल मुसळे,अक्षय ढोकणे,चंद्रकांत दोंदे ,शरद वाळुंज,अमोल वाळुंज,सोमनाथ पागिरे, संदिप येवले यांना घेतले होते ताब्यात घेतले होते.
पोलिस प्रशासन ६८, ६९, जमाव बंदी आदेश कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजले असुन दुपार पर्यंत राहुरी पोलिसांची कारवाई सुरू होती.
पोलिसांनी उड्या मारणार्यांची धरपकड !
पदाधिकार्यांनी मुळा धरणात उड्या मारल्या सचिन ताजने यासह पोलिसांनी पाण्यात उड्या टाकणाऱ कार्यकर्त्यांना मज्जाव करत ताब्यात घेतले तर काही पोलिस कर्मचाऱ्यानी धरणात बोटीच्या सहाय्याने काहींना वर काढले यावेळी पोलिस कर्मचारी अमित राठोड ,अमोल पडोळे यांनी बोटी द्वारे कार्यकर्त्यांना वर घेतले.
खेवरे नाना व रवींद्र मोरें सह ११ जण ताब्यात!
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे ,भागवत मुंगसे,हमीद पटेल ,राहुल चोथे , कैलास शेळके,विजय सिरसाट सुनिल शेलार ,सुभाष चोथे ,विशाल तारडे,प्रशांत शिंदे मीनानाथ पाचरणे, विठ्ठल सुरवंशी.