मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा-बेलापुर ग्रामस्थांची मागणी.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा-बेलापुर ग्रामस्थांची मागणी.
बेलापुर व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या अचानक वाढली असुन या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे गेल्या काही दिवसापासून गावात मोकाट कुत्रे गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत अज्ञात वहानातुन पहाटेच्या वेळेस टेम्पोतुन हे कुत्रे बाजार तळाजवळ सोडण्यात आल्याचे काही नागरीकांनी पाहीले आहे आता टेम्पोतुन आणलेले हेच कुत्रे टोळक्याने गावात फिरत आहे गावातील कुत्री व नव्यानेच गावात दाखल झालेली कुत्री एकमेकावर हल्ले करत आहे . या मोकाट कुत्र्यापासुन लहान मुले तसेच जनावरांना धोका आहे .मागे काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे प्रवरा पुलाजवळ कुत्रे सोडण्यात आले होते त्या वेळी नागरीकांच्या तक्रारीवरुन ग्रामपंचायतीने मोकाट कुत्री पकडून बाहेरगावी सोडली होती त्याच पध्दतीने पुन्हा मोकाट कुत्रे पकडून न्यावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे या बाबत नुकतेच बेलापुर ग्रामपंचायतीने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिलेली असुन त्या तक्रारीतही अज्ञात वाहनातुन ही कुत्री सोडण्यात आली असल्याचे म्हाटले आहे