पानेगाव येथील वीटभट्टीवरुन एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण.सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पानेगाव येथील वीटभट्टीवरुन एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण.सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
सोनई –नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानेगाव येथील वीट भट्टी वरून एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गंगथडी परिसरात खळबळ उडाली आहे कारण एकाच वेळी दोन अल्पवयीन मुलींना पळून नेण्याची घटना घडली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १६ रोजी करजगाव येथील रहिवासी हे पानेगाव येथील अशोक चातुरदास पवार हे दत्ता घोलप रा. पानेगाव यांचे वीटभट्टीवर कामाला होते. त्यांची मुलगी अंजली अशोक पवार वय. १३ वर्षे ६ महीने ही कुणीतरी फुस लाऊन पळवून नेले असल्याचे दि. १७ रोजी दाखल असलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे यावरून गुन्हा र. नं. १४५/२०२५ बिएनएस चे कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब तागड हे करत आहेत. तर दुसरी फिर्याद ही पानेगाव शेजारील शिरेगाव येथील रहिवासी हे सुद्धा घोलप यांच्या भट्टीवर कामाला होते राजेंद्र अशोक बर्डे हे देखील घोलप यांचे वीटभट्टवर कामाला होते. त्या ठिकाणी काम करत असताना त्यांची मुलगी वैष्णवी राजेंद्र बर्डे वय. १३ वर्षे ३ महीने असलेली मुलगी हीस देखील कुणीतरी अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेले असल्याचे दि. १७ रोजी दाखल असलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दाखल वरील फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र नं. १४६/२०२५ बिएनएस चे कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए. एम. दहिफळे हे करत आहेत.