टाकळीभान बस स्टॅन्ड होण्याची आवश्यकता…
–विद्यार्थी प्रवाशांच्या गैरसोयी कडे दुर्लक्ष….
टाकळीभान येथे नेवासा फाटा ते बाभळेश्वर रस्त्याचे रुंदी करण्याचे काम सुरू झाले असता ,टाकळीभान येथे रुंदीकरणाच्या कामाचे नाव खाली, बस स्टॅन्ड काढले गेले, त्यामुळे विद्यार्थी व सर्व प्रवाशांचे कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये मोठे हाल झाले, उन्हाळा संपत आला असून पुढील पावसाळा सुरू होणार आहे, यासाठी विद्यार्थी व प्रवाशांना थांबण्यासाठी, विसाव्यासाठी बस स्टँड ची गरज पडणार आहे, अन्यथा त्यांचे काय हाल होतील हे सांगण्याची गरज नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाने बस स्टॅन्ड करून देऊ असे आश्वासन दिले होते परंतु त्यांची कोणतीही कार्यवाही दिसत नाही, त्यामुळे प्रशासनाने, व संबंधित विभागाने जागे होऊन हा महत्त्वाचा प्रश्न मिटवावा.अन्यथा पुढे जून मध्ये शाळा कॉलेज सुरू होणार असून बससेवा सुरळीत सुरू झाली आहे, त्यामुळे बस स्टॅन्ड शिवाय पर्याय नाही, तो प्रश्न या महिन्यात मार्गी लावावा अशी मागणी विद्यार्थी ,पालक ,प्रवासी करत आहेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी उन्हाळ्यामध्ये बस स्टँड अभावी मोठा त्रास काढला आहे, बस स्टैंड ची सोय झाली नाही तर पुढचे पावसाळ्यातील दिवस अवघड आहे, जून मध्ये शाळा कॉलेज सुरू होणार आहे त्या पूर्वी बस स्टँड झाले तर विद्यार्थी व प्रवाशांना मोठा आधार होईल, तरी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावावा ही संबंधित खात्याला विनंती… (महाविद्यालयीन विद्यार्थी, टाकळीभान )