मानोरीत बिबट्याची दहशत कायम दोन शेळ्या ठार एक गंभीर जखमी.
मानोरीत बिबट्याची दहशत कायम दोन शेळ्या ठार एक गंभीर जखमी.
राहुरी तालुक्यातील मानोरी शिवारात बिबट्याची दहशत कायम सुरू असून आज पहाटेच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या घरासमोरील बांधलेल्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला चढविला यामध्ये दोन शेळ्या ठार तर एक शेळी गंभीर जखमी केली आहे शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली या परिसरामध्ये बिबट्याचा अनेक दिवसापासून मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करून देखील अद्याप या ठिकाणी वन विभागाने पिंजरा न लावल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे भागवत गुंडाजी खामकर राहणार मानोरी तालुका राहुरी या शेतकऱ्याच्या पाच फूट गोठ्याच्या तार कंपाऊंड व तसेच सिमेंटच्या भिंतीवरून उडी मारून बिबट्याने आत प्रवेश करत तेथे बांधलेल्या शेळ्यावर हल्ला चढविला यामध्ये दोन शेळ्या ठार केल्या तर एक शेळी गंभीर जखमी केली कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्याने भागवत खामकर हे घराच्या बाहेर आले असता बॅटरी लावून शेडमध्ये प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली त्यानंतर बिबट्याने शेड मधून उडी मारून धूम ठोकली सदर घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर ताबडतोब वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस एस जाधव साहेब व शेळके साहेब यांनी घटनास्थळी पाहणी केली असून सदर घटनेचा पंचनामा प्रत्यक्ष पंचांसमोर केला आहे या परिसरामध्ये गेल्या तीन-चार महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे या काळात ठिकठिकाणी पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करून सुमारे 20 हून अधिक पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे या परिसरामध्ये सुमारे पाच बिबटे मादी पिल्लासह वावरत असल्याची येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे भविष्यामध्ये शेतकऱ्यावर या बिबट्याने हल्ले करू नये आणि एखादी दुर्घटना घडू नये यासाठी वन विभागाकडे वेळोवेळी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती मात्र अद्याप देखील या ठिकाणी वन विभागाने पिंजरा न लावल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे सदर घटनेचा गांभीर्याने दखल घेऊन वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावावा अशी मागणी माजी उपसभापती रवींद्र आढाव माजी उपसरपंच अण्णासाहेब तोडमल भाऊसाहेब आढाव बापूसाहेब वाघ सोसायटीचे संचालक नवनाथ थोरात माजी सरपंच बाळासाहेब आढाव माजी उपसरपंच शामराव डॉक्टर योगेश आढाव माजी उपसरपंच मनोज ठुबे किरण भिंगारे सोसायटीचे संचालक साहेबराव बाचकर नानासाहेब तनपुरे सोपान आढाव भास्कर देवकाते सतीश आढाव दत्तू चोथे राजेंद्र आढाव संतोष खुळे नानासाहेब आढाव अर्जुन पोटे बाळासाहेब कारंडे येथील शेतकऱ्यांनी केली आहे