शंभर रुपायांचा गेवराईत आनंदाचा शिधा वाटप* *शिधाची संपूर्ण किट कार्डधारकांना*

*शंभर रुपायांचा गेवराईत आनंदाचा शिधा वाटप*
*शिधाची संपूर्ण किट कार्डधारकांना*
*महाराष्ट्र शासनाने यंदा दिवाळी निमित्त राज्यातील स्वस्त धान्य दुकानातील कार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जात आहे.त्या अनुषंगाने शुक्रवार पासून गेवराई शहरातील विवीध स्वस्त धान्य दुकानात शिधा थेट कार्डाधारकांच्या उपस्थितीत चार खाद्य पदार्थ असलेल्या आनंदाचा शिधा वाटप करण्यात येऊ लागला आहे*.
*राज्य शासनाने यंदा कार्डधारकांना शंभर रुपायात चार खाद्य पदार्थांचा शिधा देण्यात येऊ लागला आहे.हरभरा दाळ,तेल,साखर व रवा असे हे खाद्य पदार्थ प्रत्येकी एक किलो प्रमाणे आहे.गेवराई शहरातील स्वस्त धान्य दुकानातून शासनाने दिलेला आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरवात कार्डधारकांच्याच उपस्थितीत करण्यात आली .महागाईच्या काळात शंभर रुपायात शासनाकडून चार खाद्य पदार्थांचा शिधा मिळत आसल्याने सर्व सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.दरम्यान शिधा कार्डधारकांनी शंभर रुपायातील चार खाद्य पदार्थांचा आनंदाचा शिधा लवकरात लवकर घेऊन जावा असे आवाहन राशण दुकानदारांनी केले आहे*.

