वृध्द आई वडीलांना घराबाहेर काढणाऱ्या दिवट्यांना समाजाने धडा शिकवावा- ह भ प कांडेकर महाराज

वृध्द आई वडीलांना घराबाहेर काढणाऱ्या दिवट्यांना समाजाने धडा शिकवावा- ह भ प कांडेकर महाराज
भारतीय संस्कृती ही मातृ देव भव् पितृ देव भव् मानणारी असली तरी आज समाजात वृध्दाश्रमांची वाढती संख्या ही चिंताजनक असुन आई वडीलांना घराबाहेर काढणाऱ्या दिवट्यांनाही समाजाने धडा शिकवावा असे आवाहन आचार्य विद्यावाचस्पती, दिल्ली विद्यापीठाचे सिनेट सदस्य ह.भ.प.डॉ.शुभम महाराज कांडेकर यांनी केले.
शिरसगाव येथील रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ असलेल्या माऊली वृद्धाश्रमाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रवचन करताना आचार्य डॉ.शुभम महाराज कांडेकर बोलत होते.शिरसगावचे लोकनियुक्त सरपंच आबासाहेब उर्फ बंडू पाटील गवारे हे प्रमुख आतिथी म्हणून उपस्थिती होती.वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष दशरथ वाघुंडे यांनी स्वागत करून प्रास्ताविक भाषणातून गेल्या पाच वर्षातील वाटचाल सांगितली.श्रीविठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांचे संतपूजन सुभाष वाघुंडे आणि सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी केले.आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार वाघुंडे परिवाराने केला.आचार्य डॉ.शुभम महाराज कांडेकर यांनी माऊली वृद्धाश्रमाच्या सेवाकार्याचे महत्व सांगत वृद्धाश्रम ही आपली संस्कृती नाही.ती आजच्या भरकटलेल्या व्यवस्थेतून गरज झाली आहे.ज्यांना अपत्य नाही त्यांच्यासाठी वृद्धाश्रम असणे गरजेचे आहेत परंतु स्वतःला उच्चशिक्षित उच्च विद्याविभूषित म्हणविणारे आई, वडिलांना वृद्धाश्रमात पाठवितात ही आपल्या संस्कृतीत जन्माला आलेली विकृती आहे. मी आई, वडिलांना दुर्लक्षित करणाऱ्याच्या घरी कीर्तन, प्रवचन करीत नाही.जेथे कीर्तन तेथे वृक्षारोपण ही माझी पद्धती आहे.मी दिल्ली विद्यापिठात सिनेट सदस्य असलो तरी आई, वडिलांना सोडले नाही,आपली संस्कृती जपणे, माणुसकीने मदत करणे हीच खरी श्रीमंती असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना सरपंच आबासाहेब गवारे पाटील म्हणाले,की काळाराम मंदिरामागे 2017मध्ये स्वतःच्या छोट्या घरातच वाघुंडे परिवाराने वृद्धाश्रम सुरु केला, अतिशय कमी जागेत असे सेवाकार्य करणे अवघड होते, म्हणूनच शिरसगाव हद्दीत ही 12 गुंठे जागा येथे देण्यात आली, त्यामुळे हे सेवाकार्य सुरळीत झाले.या जागेचे भाग्य उजळले,असे सांगून त्यांनी वाघुंडे परिवाराचे कौतुक केले. साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,प्राचार्या डॉ. गुंफाताई कोकाटे, बेलापूर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई,चित्रकार रवि भागवत, आदिंनी मनोगत व्यक्त केले.प्राचार्य डॉ. गुंफाताई कोकाटे यांचा वडिलांसह सत्कार करण्यात आला.सूर्यकांत कर्नावट यांनी या वेळी वृद्धाश्रमास देणगी दिली .प्राचार्य तुळशीराम शेळके, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, डॉ. बाबुराव उपाध्ये,देविदास देसाई, डॉ.कमलजितकौर बतरा, बद्रीनाथ वढणे, राजेंद्र बोरसे,कर्नावट बंधू, संतोष मते, गड्डेगुरुजी आदिंचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले तर डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिरीष वाघुंडे ,सौ गौरी वाघुंडे राजेंद्र देशपांडे राजेंद्र रासने शुभ़़्म नामेकर दिनेश जेजुरकर गौरव रासने सौ वंदना विसपुते सौ छाया गीरमे आदींनी विशेष प्रयत्न केले