एक धक्कादायक घटना; भावानेच केला भावाचा खून*

*बारामती तालुक्यातील माळेगाव मध्ये एक धक्कादायक घटना; भावानेच केला भावाचा खून*
*लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील माळेगावात घडली आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी दिलेल्या पैशाबाबत धाकट्या भावाने जाब विचारल्याने थोरल्या भावाने त्याला हाताने लाथाबुक्यानी मारहाण केली. यामुळे चिडलेल्या धाकट्या भावाने थोरल्यावर चाकूने वार करत त्याचा खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथे घडली*.
*मिळालेल्या माहितीनुसार कल्पेश व मंथन हे सख्खे भाऊ आहेत. मोठा भाऊ कल्पेश हा काहीही कामधंदा करत नसल्याने आईवडिलांनी आठवडयापूर्वी कल्पेशला नवीन चप्पल व्यवसायासाठी १ लाख ४० हजार रुपये दिले. मात्र कल्पेश याने दिलेल्या पैशाची गुंतवणूक शेअर बाजारात केली होती. मंथनने या पैशाबाबत विचारणा केली असता सदर पैसे शेअर बाजारात गुंतवले आहेत, मी नंतर पैसे देतो असे सांगितले*.
*त्यामुळे मंथन हा त्याच्यावर रागावला. या कारणावरून कल्पेश याने त्याला हाताने, बुक्यानी मारहाण केली. ते सहन न झाल्याने मंथन याने घरातील कपाटातील चाकू काढून कल्पेश याच्या मानेवर, छातीवर वार करत त्याचा खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथे घडली. कल्पेश अरुण धुळप (वय २६, रा . अमरसिन्ह कॉलनी, माळेगाव बुद्रूक) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा धाकटा भाऊ मंथन अरुण धुळप (वय २३) यास अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली*.