वादळाने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी. कामगार तलाठ्यांना निवेदन.
टाकळीभानमध्ये वादळाने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी. कामगार तलाठ्यांना निवेदन.
श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्वभागातील टाकळीभान येथे गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळामुळे शेतातील खरीपाची पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वादळाने हीरावुन घेतल्याने वादळामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे होवुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वादळग्रस्त पट्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे गाव कामगार तलाठी अरुण हिवाळे यांच्याकडे केली आहे.
आपतग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गुरुवार दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता अचानक जोराचे वादळ सुरु झाले होते. या वादळामुळे शेतातील कपाशी, सोयाबीन, बाजरी, मका, उस आदी खरीप पिके वेगवान वादळामुळे भुईसपाट झाली आहेत. पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वादळामुळे हिरावला जावुन मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या वादळी पट्यात काही ठिकाणी गारपिट झाल्यानेही पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. तरी या पट्यातील सर्व नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पहाणी करुन नुकसानीचे पंचनामे करावेत व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान या वादळामुळे शेतबांधावरील मोठमोठी झाडे उन्मळुन पडली आहेत तर काही ठिकाणी शेत वस्तीवरील घरावर, पञा शेडवर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. महावितरणचे वीजेचे आनेक ठिकाणी खाब पडल्याने वीज वाहक तारा तुटल्याने वीज गायब झालेली आहे.
या निवेदनावर सुनिल बोडखे, उमेश त्रिभुवन, मच्छींद्र बोडखे, गोरख बोडखे, सुनिल ञिभुवन, आनिस बोडखे, राजेंद्र कोकणे , संदीप बोडखे, अजित थोरात, बाळासाहेब शेळके, अशोक वेताळ, भाऊसाहेब कोकणे, लक्ष्मण सटाले, कल्याण आठरे आदींसह या वादळी पट्यातील शेतकऱ्यांची नावे व सह्या आहेत.