सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अर्वाच्य भाषेत कमेन्ट करणाऱ्या फैजान कुरेशी याच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्याबद्दल गुन्हा दाखल
सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अर्वाच्य भाषेत कमेन्ट करणाऱ्या फैजान कुरेशी याच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्याबद्दल गुन्हा दाखल
सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अर्वाच्य भाषेत कमेन्ट करणाऱ्या फैजान कुरेशी याच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्यानंतर मोबाईलवरूनच मुर्दुमंगी गाजवणारा फैजान कुरेशी पसार झाला आहे.*
याबाबत सविस्तर माहिती अशी की,श्रीरामपूर शहरात राहणारा फिर्यादीने त्याच्या मोबाईलवरील इन्स्टाग्राम वर “रिस्पेक्ट छत्रपती संभाजीनगर” या कॅप्शनवर बघितले असता अत्यंत क्लेशदायक हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा कुपध्दतीने फैजान कुरेशी याने टाकलेली कमेंट बघितली.छत्रपती संभाजी महाराजां प्रती प्रेम,आदर आणि त्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेले बलिदानाने त्यांना हिंदू धर्मीय ईश्वरा समान मानतात. अशा निष्कलंक आयुष्य जगलेल्या शूरवीर धर्मप्रेमी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल फैजान कुरेशी याने टाकलेली कमेन्ट जातीय तेढ निर्माण करणारी असल्याने.राष्ट्रीय श्रीराम संघाचे असंख्य सदस्य फिर्यादीला घेऊन ताबडतोब श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गेले. याबाबत फिर्याद देऊन कारवाईची मागणी केली.झालेला प्रकार गंभीर आणि शहराची शांतता भंग करणारा असल्याने त्याला तातडीने अटक करण्याची मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केली आहे.गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच इन्स्टाग्राम वर मुर्दुमगी दाखवणारा फैजान पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
धार्मिक भावना दुखवून दोन समाजात तेढ निर्माण होतील अशा पोष्ट सोशल मीडियावर टाकण्याचे प्रमाण एव्हड्यात मोठ्याप्रमाणात वाढल्याने पोलीस प्रशासनालाही डोकेदुखी वाढली आहे.आठ दिवसांपूर्वी शहरात वार्ड नंबर दोन मधील मुस्लिम मोहल्ल्यात वेस्टर्न चौकात टिपू सुलतानचे बेकायदेशीर बॅनर लावून पोलीस खात्याची परवानगी न घेता डीजे लावून मिरवणूक काढली म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी त्याबाबत तक्रारी केल्यानंतर पालिकेचे अतिक्रमण आधिकारी संजय शेळके यांनी प्रत्यक्ष स्पॉट वर जाऊन टिपू सुलतानचे लावलेले बेकायदेशीर बॅनर काढून घ्यायची तयारी केली असता त्यांना त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात संतप्त जमावाला सामोरे जावे लागले.आरटीओ कार्यालयातील कर्मचारी मारहाण प्रकरणातील आरोपी जोयेब जमादार याने दमदाटी केल्याची व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली.सरकारी कामात अडथळा आणला म्हणून जमावातील काही प्रमुख व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाने जोर लावून उचलली आहे.